पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ बास व खंडोजीस खर्चा देविलें तें दिल्हें विदित जालें पाहिजे हे विज्ञापना. [लेखांक ११५] श्री. श्रीमत् महाराज श्री स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कु- शल श्रीकृपें ता० छ० २१ जिल्काद पावेतों असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें कुलाबीयाचे मुक्कामीं पावलें. लेखनार्थ क ळला. ऐसीयास जे वर्तणूक कर्तव्य ते स्वामींचे आज्ञेनुरूपच करूं. वर- कड येथील वर्तमान तरी, आझी कुलाबीयाहून आलों; परवा कसबे पुणे - १ ह्या पत्राचे मांगें खालील मजकूर लिहिला आहे त्यांतील सनावरून व पत्रांत तीर्थरूप रा० नाना (बाळाजी विश्वनाथ) ह्यांचा नामनिर्देश केला आहे त्यावरून हे पत्र बाळाजी विश्वनाथ हयात असतांना लिहिलेले आहे असे दिसते. सन सवा ह्मणजे सवा अशरीन (इ. स. १७१६-१७) है साल असावें. ह्या वेळी स्वामी परशरामाकडेच होते. तेव्हां त्यांनी पेढे येथील सोनारांकडून मो हरांची परीक्षा करविली हेंही युक्त दिसतें. स्वामी खमस अशरीन ह्मणजे इ. स. १७२४-२५ मध्ये वरघांटें आले (ब्रह्मद्रस्वामींचें चरित्र का. सं. पृ. १३). जमा छ० १८ जमादिलावल सन सबा पारीख कदें गु॥ येसशेट सोनार मौजे पेढे, मोहरा ४१ एकूण एकबेजी रुपये. २८८ प्रत अवरंगशाही बहादुरशाही मोहरा २४ दर १२ प्रमाणे. ३४॥ प्रत मोहरा पाडेकार (?) दर ११ ॥ १६६। प्रत नव्या १४ दर ११॥ ४८८।।. ४१ २११। छ० ९ जमादिलाखर गु| खंडू मोहरा १७ दर १२ ७०० प्रमाणे २०४ व रोख ७१. २ छ० २१ जिल्काद- ता० ७ मार्च इ. स. १७३५, शुक्रवार. -