पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ वितां येत नाहीं. तैसाच प्रसंग असता तर अगत्यरूप कार्य केले जातें. आह्मांस आणखी प्रसाद पाठवाल तो खाऊं कळले पाहिजे. निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. तुझांस कळेल तसें गांवचें पारि- पत्य करणें बहुत काय लिहिणें हे विज्ञप्ति. . पेशवे. बाजीराव. श्री. [ लेखांक ११४ ] श्रीमत् महाराज राजश्री श्री परमहंस परशराम स्वामींचे सेवेसी:- आज्ञाधारक बाजीराऊ कृतानेक विज्ञापना ऐसीजे, स्वामींचे रुपये x x x x याचा हवाला वाडीचे मुक्काम घेतला. त्यास, स्वामींनीं अंतोबा व खंडोजी ऐसे पत्रे देऊन पाठविले. त्यांस एक दोन चार दिवस येथें लागले. त्याउपरी तीर्थरूप रा० नानांनीं ऐवज व पत्रे पाठविलीं तींच पाठविली आहेत. व त्याखेरीज येथें जे तरतूद जाली ते एकूण मोहरा ४१ एकेचाळीस पाठविल्या. त्याखेरीज तरतूद जाली नाहीं. आह्मीं जर स्वामींच्या कार्यास अनमान केला असेल तरी स्वा- मींच्या पायाची शपथ असे; व येथील सविस्तर वृत्त आमचें अंतोबा सांगतां कळों येईल. विदित जाले पाहिजे व बाकी ऐवज जो राहिला तोही मागून एका मासाअलीकडेच पाववूं. अंतर सहसा पडणार नाहीं. मोहरा पावलीयाचा जाब पाठवून द्यावया आज्ञा केली पाहिजे. अंतो- ● - १ विरूवाई ही शाहूमहाराजांची राख होती. तिच्या पोटी राजसबाई नामक एक कन्या झाली होती. हिजला शाहूमहाराजांनी जातीकडून शुद्ध करवून घेऊन मल्हारराव कदम बांडे कोपरेळकर यांस दिली होती. परंतु ह्या गोष्टीस मलव- डीकर घाटगे व फलटणचे निंबाळकर हे विरुद्ध होते. त्यामुळे त्यांचे व शाहू महाराजांचें सौरस्य कमी झाले होते. ह्या प्रसंगाचा ह्या पत्रांत उल्लेख असावा असे वाटते.