पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसीः - अपयें सौभाग्यादिसंपन्न विरूबाई कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करावया आज्ञा केली पा हिजे. यानंतर आपण खंडोजीबरोबरी आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. गांवाविशीं लि- हिलें, ऐशास राजश्री स्वामींनीं रा० अंबाजीपंतास आज्ञा केली आहे. त्यास, रा० वाजीराऊ पंडित प्रधान असले पाहिजेत. ते निजामाच्या भेटीस गेले आहेत. ते आलीयावरी पारपत्य होईल. येविसीं सविस्तर वृत्त राजश्री स्वामींनीं लिहिले आहे त्यावरून कळों येईल. श्रीचा प्रसाद फणसपोळी व मेवा पाठविला तो प्रविष्ट जाला. श्रुत होय. २५ सावान बहुत काय लिहिणें हे विनंति. हेच पत्रीं अपत्यें बसवंतराऊ ख़ासखेल चरणावरी मस्तक ठेऊन सा० दंडवत विनंति लिहिले परिसिजे, लोभ असों दिल्हा पाहिजे हे विज्ञप्ति. [लेखांक ११२] [लेखांक ११३] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न विरूबाई कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वामींनीं निजानंदलेखन केले पाहिजे. यानंतर स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाथ अवगत जाला. श्रीचा प्रसाद पाठविला तो प्रविष्ट जाला. यानंतर फलटण देशच्या गांवचा मजकूर लिहिला कीं, साबाजी नाईक यांस आपले पत्र व माणूस पाठवून गांवास कौल आणवावा, तो कळों आला. ऐशास त्यांचें आमचें रहस्य काय आहे तें तुझांस ठाऊक आहे. प्रस्तुत जामातामुळे अधिकोत्तर प्रसंग आहे आणि आझी त्यांस पत्र एकंदर लिहीत नाहीं. याकरितां आपल्या गांवाविसीं माणूस व पत्र पाठ- -