पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ र्वाद देऊन प्रत्यक्ष प्रधानपद मिळवून दिले. परंतु ह्यासंबंधाचे अस्सल पत्र- •व्यवहार अद्यापि उपलब्ध झाले नाहींत. त्यामुळे त्या कागदपत्रांच्या अभावीं ह्याबद्दलची मनोरंजक हकीकत विस्तृतपणे येथें देतां येत नाहीं. व स्वामींनी जंजिन्याचा हबशी सिद्दी याकूदखान ह्यास प्रसन्न करून त्याज- कडून पेढें व आंवडस हे दोन गांव ३० स० १७०८ नंतर मिळविले; तेव्हां स्वामींचा व हबशांचा संबंध केव्हांपासून जडला ह्याची सरासरी अटकळ करितां येते. ह्यानंतर स्वामींचा व परशुराम त्रिंबक प्रतिनिधि व कान्होजी आंग्रे ह्यांचा परिचय झाला असावा. कोंकणामध्यें प्रतिनिधि व आंग्रे ह्यांचा अंमल अधिक असल्यामुळे स्वामींची व त्यांची ओळख होऊन त्यांची स्वामींवर भक्ति जडली असावी. स्वामींस वर निर्दिष्ट केलेले पेढें व आंबडस हे दोन गांव हवशाकडून इनाम मिळाले होते, ह्यांपैकी मौजे पेढे हा गांव हवशाच्या अमलांत असल्यामुळे तो दरोवस्त इनाम मिळाला होता. परंतु आंबडस गांव अर्धा महिपतगड तर्फेनें प्रतिनिधींच्या अमलांत असल्यामुळे तो स्वामींस अर्धा इनाम मिळाला होता. तो दरोबस्त इनाम करून घेण्याकरितां स्वामींनीं परशुराम त्रिंबक प्रतिनिधि त्यांस विनंति केली. त्याप्रमाणे प्रतिनिधींनीं स्वामींची योग्यता जाणून तो गांव महिपतगड तर्फेनें इनाम करून दिला. पुढे स्वामींचा व प्रति- निर्धीींचा स्नेहसंबंध दृढतर होऊन, राजकारणप्रसंगांत त्यांनीं प्रतिनिधींस चांगलें साहाय्य केल्यामुळे, प्रतिनिधींनीं स्वामींस मौजे डोलें व महाळुंगे तर्फ पांवस हे दोन्ही गांव महिपतगडतर्फेनें शाहु महाराजांच्या मुद्रेनिशीं निमें इनाम करून दिले. ह्यावरून ३० स० १७१० पासून स्वामींचा महाराष्ट्राच्या राजकारणांत १ काव्येतिहाससंग्रहांतील ब्रह्मद्रस्वामींच्या चरित्रांत जी माहिती दिली आहे त्यावरून हे गांव परशुराम त्रिंबक प्रतिनिधि ह्यांनीं स्वामींस इनाम करून दिले असे दिसते. परंतु 'सातारा ग्याझिटियर 'करितां लिहिलेल्या माहितीमध्ये हे गांव शके १६४२ झणजे इ० स० १७२० मध्ये इनाम दिले असे लिहिले आहे. तो सन खरा मानिला तर ह्या वेळीं परशुराम त्रिंबक प्रतिनिधि हयात नसून त्यांचे पुत्र श्रीनिवास परशुराम हे असले पाहिजेत. परशुरामपंत ह्यांचा काल ता० २७ मे ३० स० १७१८ रोजी झाला.