पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. दोन हजार रुपये दिल्हे त्याचे दस्तुरीविशीं लिहिलें; ऐशास राजश्री स्वामींनी दस्तुरीची पद्धत राज्यांत घातली त्याप्रमाणे चालतें. परंतु स्वामींनीं लिहिलें त्यावरून जरूर जाणून रु० १२५ सवारों पाठविले आहेत. ते घेऊन पावल्याचें उत्तर पाठवणें. काशीफळें आह्मांकारणें सुमारें ४ चार पाठविलीं तीं पावलीं. बहुत काय लिहिणें, कृपा निरंतर असों दीजे हे विनंति. पौ० छ २३ माहे रबिलावल सन सवा. ० श्री. [लेखांक १११] तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- - अपत्यानुरूप सौभाग्यादिसंपन्न विरूवाई कृतानेक सा० दंडवत वि नंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे. यानंतर, केरोजी सोनवणी याचा व येसाजी सोनवणी मौजे वीरमाडें या उभयतांचा कजिया होता, तो स्वामींनीं गोतन्याय मनास आणून चौघांचे साक्षीनिस निर्वाह करून निवाडा केला. त्याचें लिहिलें यांस दिल्हें; याचें लिहिलें त्यांस दिल्हें; आणि आझांसही हुजूर लेहून पाठ- विलें. ऐसें असतां प्रस्तुत केरोजीच्या सासऱ्याच्या घरी येसाजीचा भाऊ गिरजा व ह्यलोजी माळी जाऊन बैसले आहेत. मागती कजिया सांग- तात ह्मणून हुजूर विदित जालें. तर ये गोष्टीचा निवाडा जाला असतां मागती त्यास लबाडी करावयास दरकार काय आहे ? याउपरी येसाजीस व झलो माळ्यास हुजूर आणविलें असे. तर पत्रदर्शनीं उभयतांस पाठ- वून देणें. बहुत काय लिहिणें, कृपा असों दीजे. वरकड सविस्तर कावजी- मुखवचनें निवेदन करितां श्रुत होईल हे विनंति. ● १ छ० २३ माहे रबिलावल सन सवाः - ता० २२ जुलई इ. स. १७३६, गुरुवार.