पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक १०८] १२९ श्री. श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें विशेष - सोमाजीबरोबरी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. श्रीचा प्रसाद पादुका पाठविल्या त्या प्रविष्ट जाल्या. रा० रघुजी भोंसले यांजकडे वाचादत्त रुपये तीन हजार येणें ; ऐसीयासी येथून जासूद जोडे जाताती, त्या समागमें रा० रघुजी भोंसले व रा० भास्कर राम यांस ताकीदपत्रे पाठविली जातील. बहुत काय लिहिणें हे विनंति, [ लेखांक १०९] श्री. तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिले पाहिजे. विशेष भिकू- बराबरी पत्र पाठविलें, लिहिलें वर्तमान कळले. गुलाबकंदाविशीं लि- हिलें, त्यावरून गुलाबकंद वजन पक्के ४४१ शेर पाठविला, तो घेणें. यानंतर वेदमूर्ति धोंडभट काशीकर हे भले ब्राह्मण, यासमागमें रा० सोनाजी बावाच्या अस्थी रवाना कराव्या ह्मणून लिहिलें, तरी चिरंजीव बरानजी मोहिते स्वारीस गेले आहेत; त्यांणीं काय रवानगीचा विचार केला आहे कळलें नाहीं. स्वारीहून आलीयावरी त्यांस पुसोन जो जाब होणें तो होईल. छ० २५ जिल्हेज बहुत काय लिहिणें हे विनंति. [ लेखांक ११० ] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न विरूबाई कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. यानंतर आपण , ९ - - -