पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ आह्मीं जावें ह्मणून लिहिलें, तरी स्वामींनीं अभिमान घरिला तो सि- द्धीस गेल्याव्यतिरिक्त स्वामींचेंही जाणें होत नाहीं हा आपण निश्चय मानिला आहे. प्रासादिक वस्त्र दुलई पाठविली आहे हे कोणास न देणें ह्मणून लिहिलें, ऐसीयास प्रासादिक वस्त्र कोणास देत नाहीं. अं- गीकार करून ठेविली असे. छ १७ शाबान बहुत काय लिहिणें हे विनंति. [लेखांक १०६] श्री. - श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सगुणाबाई चरणावर मस्तक ठेऊन दं- डवत प्र० विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष-आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. पत्रीं कित्येक ममतापुरस्कर लेख केल्या, बहुत समाधान जालें. चां- दणी पातळाविशीं लिहिलें त्यावरून शालू चांदणी किंमतदार कम- •ळाजी वाघमारा याजबराबरी एक पाठविला असे. प्रविष्ट जालीयाचें उत्तर पाठविले पाहिजे. बहुत काय लिहिणें, कृपा असों द्यावी हे विनंती. [ लेखांक १०७] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- प्रति सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब दंडवत उपरी पत्र पा ठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. रविवार समाधीहून धा- वडशीस समारंभ जावें लागतें तरी नगारीयासी हत्ती अथवा उंट पाठविणे झणून लिहिलें; तरी समानमुद्धां उदईक मंदवारी दोन प्रहरा पाठवून देऊं. आपणास कळावें. जवानीं भिकू सांगतां कळों येईल. बहुत काय लिहिणें. -