पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ त्यावरून चित्तास बहुत खेद जाला. याउपरी आरोग्यतेचें वर्तमान लिहून पत्रद्वारें संतोषवीत जाणें बहुत काय लिहिणें. [ लेखांक १०४] श्री. तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल वैशाख शुद्ध पूर्णिमा सौम्यवार जाणून स्व- कीय लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष शरीरभावनेचें वर्तमान तरी आशीर्वादें कुशल असे. यानंतर राजश्री स्वामींच्या शरीरीं दोन तीन दिवस सावकाश वाटत नाहीं. आपल्या आशीर्वादेंकरून आरोग्य होईल. वरकड वर्तमान यथास्थित असे. छ १३ रबिलावल बहुत काय लिहिणें हे विनंति. [ लेखांक १०५] श्री. श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामींचे सेवसीः- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे विशेष पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. कित्येक ममतापुरस्कर लिहिलें. ऐसीयास स्वामींनीं कृपा केली ते समयीं सर्व सिद्धि मनोदयानु- रूप घडोन आल्या, ऐसाच दृढतर निश्चय धरिला तो मनोमन साक्ष असे. स्वामींची कृपा पूर्ण असतां मनोदय पूर्ण न होय ऐसें काय आहे ? आपला तो भावार्थ स्वामींच्या पायाव्यतिरिक्त आहे ऐसें नाहीं. वरकड चित्त उदास जालें, निरोप दिल्हा तरी श्री रामेश्वरास जाऊं, हाणून लिहिलें, तरी स्वामींनीं निश्चय केला आहे तो सिद्धीस पाविल्याविना आपले जाणें श्रीस कैसें होईल व आमच्यानेंही निरोप कैसा देवतो १ तथापि ● - - १ वैशाख शुद्ध पौर्णिमा सौम्यवासरः - ता० २७ एप्रिल इ. स. १७४३, बुधवार.