पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ द्याप आले नाहींत. याउपरी स्वामींच्या लिहिल्यावरून आजी ह टकून थोडे बहुत रुपये तूर्त मागून घेऊन पाठवून देऊं. वरकड इंग्रज फिरंगी व सांवत आरमार सुद्धां आह्मांस सामील आहेत तरी गोवलकोट व अंजनवेली आमचे स्वाधीन करणें, घेऊन देऊं, ह्मणून लिहिलें तर उत्तम गोष्ट आहे. इंग्रज व फिरंगी व सांवत यांसी पत्रे पाठवून बोलल्याप्रमाणे सामील होऊन खामखा घेऊन देतील ऐसा करार असेल तर त्याचे वकील हुजूर मातवर असतील ते आणून हुजूर पाठवून द्यावे; झणजे त्यास याच कराराच्या गोष्टी पुसोन एक मातबर वकील ठेवून घेऊन विल्हे लाविले जाईल. त्याहीमध्ये ह्या राज्यभा राच्या गोष्टी आहेत. केवळ राजश्री स्वामींवांचून होतात ऐसा अर्थ नाहीं. हे आपणही जाणतात. या मांगें या गोष्टीचा उद्योग स्वामींनीं चित्तांत आणिला नव्हता. आजी अशा गोष्टी जाल्या तेव्हां शत्रूचा नाश हरप्रकारें तरी होईल हा स्वामींचा आशीर्वादच जाहला. आतां आपण करूं ह्मणोन लिहिले तर तेंही बहुतच उत्तम. परंतु या कार्यास जे अनुकूल होणार त्यांस पत्र पाठवून, त्यांचें मातबर कोणी आणवून, राजश्री स्वामींस त्यांचा करार करवून, त्यांस येथें ठेववून स्वामींचे आज्ञेनें जें कर्तव्य तें केले पाहिजे. महालतर्फेनें राज्यकारभार होत नाहीं. बहुत काय लिहिणें हैं विनंति. [लेखांक १०३] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न मातुश्री सखवारबाई व सगुणाबाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. यानंतर स्वाम- कडील आशीर्वादपत्र येऊन सांभाळ घेत नाहीं; तर ऐसें केलें न पा- हिजे. निरंतर कुशलवृत्त लिहून आशीर्वादपत्र सांभाळ केला पाहिजे. प्रस्तुत आपल्या शरीरीं सावकाश वाटत नाहीं हाणून वर्तमान ऐकिलें, -