पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ नाहीं. समाधान असों देणें, राजश्री शिवाजीपंतांनीं आपाजी आंगरे यांस सरखेलीचीं वस्त्रे बाबा देवीत होते ह्मणून तुळाजी आंगरे यांस लिहिलें त्यावरून ते आझांवरी फार श्रमी आहेत हाणून लिहिलें. त्या- वरून आह्नीं शिवाजीपंतास विचारिलें आणि त्यांणी तुमच्यावरी हात ठेविला. त्याजपासून कांहीं अंतर नाहीं. तुझीच कोणाजवळ बोललां असाल तें कर्णोपकर्णी त्यांस कळले असेल तर कळेना. डौर गोसावी याचा मजकूर लिहिला तर ते ३ गांव आझांकडे नाहींत. त्यांचा जातीचा कजिया आहे. ते व ते समजतील. आमचे चिठीनें मना होत नाहींत याकरितां चिठी पाठविली नाहीं. जाणिजे, बहुत काय लिहिणें हे विनंति [ लेखांक १०१] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. यानंतर आपण पत्र पाठविलें तें पावोन लिहिले वर्तमान कळों आलें. गोवलकोट अंजनवेल येथील मजकूर तपशिलें लिहिला, ऐशास आपले आशीर्वादें व श्रीचे कृपेंकडून फत्ते होईल. कांहीं स्वामींनीं फिकीर न करणें निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. [ लेखांक १०२] - श्री. श्रीमत् परमहंस स्वामी स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सकल सौभाग्यादिसंपन्न सखवारबाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पा- हिजे. यानंतर स्वामींनीं पत्र पाठविलें तें पावोन सकल वर्तमान श्रवण जालें. ऐसीयास उदकपैकीं च्यार हजार रुपये राहिले ते पाठवणें ह्म- णून आज्ञा केली, तरी ते रुपये राजश्री स्वामींकडून यावे, ऐशास अ- ● -