पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक ९९ ] श्री. तीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस स्वामी स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई साहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष: स्वामींनीं पत्र पाठविलें तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन समा- धान जालें. पेट्याही लौकरच येतील. वचनाप्रमाणें पैका पाठवून द्यावा ह्मणून आज्ञा, ऐसीयासी पैक्याचा अर्ज राजश्री स्वामींस केला नव्हता. याउपरी अर्ज करून पैका मागून घेऊन पाठवून दिल्हा जाईल. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विनंति. श्री. - १२४ [ लेखांक १०० ] - तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. यानंतर तुझीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. रुपये पाठविणें ह्मणून लिहिलें, त्यास प्रस्तुत आह्मीं मोबदला करून पाठवावे तर आझी मोहिमेच्या प्रसंगाकरितां पाठवाव- यास गांठ पडत नाहींत. राजश्री स्वामींनी मान्य केलें [तर] त्यांजकडून विचारेंकडून घेऊन पाठवितों अंतर होणार नाहीं. गांवचा मजकूर लिहिला तर स्वामींच्या हातावरी उदक घातले आहे, त्यास तें कार्य फत्ते जाहलियावरी आंगया हुजूर येईल, उपरांतिक त्याजपासून ठीक करून घेऊन स्वामींस अर्पण केला जाईल. कामेविशीं अंतर तिळमात्र होणार नाहीं. संदुखा २ दोन पाठविल्या आहेत, घेऊन उत्तर पाठवणे हाणून लिहिले, तर संदुखा उत्तम आहेत; पावल्या. वोढणाही यांना पाठविणें झणून लिहिले, तर त्याची तरतूद करून पाठवू. आंगन्याकडील साहि- त्याचा मजकूर लिहिला, त्यास विचारेंकडून त्याची तरतूद करून पाठवू; परंतु पर्जन्याचा तोटा आहे याकरितां होतां होईल त्यास अंतर होणार -