पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ [लेखांक ९६ ] श्री. तीर्थरूप श्री परमहंसबाबा स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल जाणोन स्वकीय आज़ा लेखन केली पाहिजे विशेष. तुझांकारणें जामवार बादली सोनेरी १ एक पाठविली आहे. घेऊन उत्तर पाठविले पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विज्ञप्ति. [लेखांक ९७ ] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसीः— - - अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिले पाहिजे. यानंतर स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. मौजे दाळिंवे ये- थील पाटिलकीचा मजकूर तपशिलें लिहिला; ऐशास आपल्या लिहि- ल्यावरून राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांस पत्र लिहिले आहे व राजश्री दादोबासही ताकीद केली आहे. ते मनसुवी फिरविणार नाहींत. बहुत काय लिहिणें, कृपा निरंतर असों दीजे हे विनंति, [ लेखांक ९८ ] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसीः— अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. यानंतर स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. कासाराच्या व कृष्ण जोशाच्या कर्जाचा मजकूर लिहिला ऐशास त्याची मनसुबी तहकूब जाली होती, परंतु आपल्या लि- हिल्यावरून सध्या क्रिया त्यास नेमिली आहे. क्रियाही होईल. कळलें पाहिजे. निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लि हिणें हे विनंति. -