पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ नंतर स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान कळों आलें. पालखीच्या सरंजामास मौजे घारगांव देविलें पाहिजे - णून लिहिलें, ऐशास घारगांव स्वामींपेक्षां अधिकोत्तर आहे ऐसें नाहीं; परंतु मौजे मजकूर आमचा वतनी गांव याकरितां देतां नये. राजापूर प्रांतें एक गांव सरंजामाबद्दल देतों हाणून राजश्री स्वामींनीं करार केला. सनदा पाठवून देतील. समाधान असों देणें निरंतर आशीर्वाद- पत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विनंति. [ लेखांक ९५ ] श्री. श्रीमत् श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादि संपन्न सलवारबाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. •यानंतर स्वामींनी आज्ञापत्र पाठविलें तें पावलें. मौजे रोपले ता० हवेली परांडे हा गांव मोंगलाई तर्फेनें राजश्री जानोजीराव निंबाळकर याज- कडे आहे, तर त्यास पत्र पाठवून गांव मोंगलाई तर्फेनें मागून घेऊन सनदा आणून आमचे स्वाधीन करणें ह्मणून लिहिलें, तर तो निजामन- मुलकाचा एखत्यार आहे. तो गांव मोंगलाई तर्फेनें कांहीं येत नाहीं. त्याहीमध्ये आमचा खालसाही नाहीं. वाचुजी पैठणकर याजकडे स त्तावीसरों रुपये आहेत ते ताकीद करून देवणें हाणून लिहिलें; तर प्र- स्तुत तो पारिखा आहे. त्याहीमध्यें राजश्री येसाजी भोंसले यांणीं रुपये देतों ह्मणून करार केला आहे. ते आलियावर त्यास सांगून आधीं आपले रुपये देववून उपरांतिक दुसऱ्याचे वारील. कुरणाचा मजकूर लिहिला तर आझी खासगत खिलारास राखिलें आहे तें देतां येत नाहीं. कापते- समयीं पांच हजार गवत अगत्यच असले तर देऊं. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विनंति. -