पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ कुशल जाणून स्वकीय लेख करीत गेलें पाहिजे. यानंतर स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. सुखरूप आश्रमास पावलों ह्मणून लिहिलें त्यावरून बहुत समाधान जालें. प्रसाद द्राक्षे पुडा पाठविला तो पावला. हे विनंति. [ लेखांक ९३ ] श्री. तीर्थस्वरूप श्रीमत् परमहंसस्वामी स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष तुझीं आशीर्वादपत्र पाठविलें ते उत्तम समयीं प्रविष्ट होऊन संतोष जाला. लिहिलें कीं, परशरामीं राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यांणीं ब्राह्मण ठेविला आहे त्यास पत्र पाठवून बाहेर काढवावा ह्मणून, तरी आह्मीं पत्र ल्याहावें, त्याचा प्रांत लागला तर उत्तम; नाहीं तरी विचार करावा लागेल. ऐशास त्याजकडून राजश्री विश्वनाथभट रवाना केले आहेत. सरखेल लौकरची येणार आहेत. ते आलियावरी आपल्या वि चारानुरूप त्यास सांगून त्याचा विचार केला जाईल. व शालेचे जोडी- विषयीं लिहिलें तर राजश्री शिवाजी हरी यास आज्ञा केली आहे. पाहून देतील. दुलयाचा मजकूर लिहिला तरी दुलया सिद्ध आहेत. कोणी पाठवून घेऊन जाव्या. सदैव पत्र पाठवून संतोषवीत असलें पाहिजे. आज्ञेप्रमाणें जाहले कामाचेही चालीस लाविलें. नमस्काराचे ब्राह्मण तर पहिल्यापासून चालत आहेत. कांहीं चिंता नाहीं. बहुत काय लिहिणें हे विनंति. • [ लेखांक ९४ ] ● - श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- — अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई चरणावरी मस्तक ठेवून सा- ष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. या