पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ वरील निस्सीम व अहेतुक भक्ति हीच होय. स्वामी श्री परशुरामीं प्रगट झाले त्या वेळीं तेथील देवब्राह्मणांचा अगदर्दी उच्छेद झाला होता व यवनांच्या तापा- मुळे सर्व प्रजा फार त्रस्त झाली होती. ह्मणून स्वामींनी देवालयाचा जीर्णो द्धार व जागोजाग श्रीची स्थापना करावयाचा हेतु धरून, द्रव्य व इनाम गांव मिळविण्याचा उद्योग आरंभिला. वस्तुतः स्वामी स्वतः निरिच्छ तपस्वी ● असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारें स्वार्थसाधनाची इच्छा नव्हती. परंतु त्यांचा अंतर्हेतु जगांतील कोणत्याही खऱ्या देशभक्ताप्रमाणें देशोद्धाराचा अस ल्यामुळे त्यांनीं श्री रामदास स्वामींप्रमाणे अलिप्त राहून सर्व राजकारण चाल- विलीं असें त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. श्रीची उपासना व भक्ति ह्यांचा 'दिगंत' प्रसार व्हावा व महाराष्ट्रराज्याचा अभ्युदय होऊन सर्व देशबांधव मुखी व्हावेत असा स्वामींचा उच्च मनोरथ असल्यावांचून त्यांना राजकारणांत पड- ण्याचॆं दुसरें कोणतेंही कारण नव्हते. ह्याच उच्च मनोरथास स्वामींनीं आपल्या हृदयांत जागा दिल्यामुळे महाराष्ट्राचें अपरिमित कल्याण झाले ह्यांत शंका नाहीं. स्वामी राजकारणांत केव्हांपासून पडूं लागले व त्यांचा महाराष्ट्रां- तील मोठमोठ्या सरदारांशी कसा व केव्हां परिचय झाला हे समजण्यास मार्ग नाहीं. तथापि स्वामी, शिवाजी, संभाजी व राजाराम ह्या तिन्ही छत्रप- तींच्या कारकीर्दीचे चांगले माहितगार होते व त्या वेळच्या सर्व घडामोडी त्यांस पूर्ण अवगत होत्या असे मानण्यास सबळ पुरावा आहे. त्यांच्या कित्येक पत्रांत औरंगजेब, शिवाजी ह्यांचे उल्लेख आहेत, एवढेच नव्हे तर जावलीचे चंद्रराव मोरे व मौनीबोवा गोसावी ह्यांचे दृष्टांतही दिलेले सांपडतात. शाहु महाराजांस त्यांनी प्रसाद पाठविला व बाळाजी विश्वनाथ ह्यांस आशी- व १ स्वामींनी रघोजी भोंसले ह्यांस लिहिलेल्या पत्रांत (लेखांक २९५ पहा ) बापूजी भोंसले व संताजी भोंसले ह्यांस साहाय्य केल्याची पूर्वीची हकीकत दिली आहे. ती वाचली ह्मणजे स्वामींचा महाराष्ट्राशीं फार जुना संबंध असला पाहिजे असें दिसून येतें. बापूजी भोंसले ह्यांस स्वामींनीं हबशाकडून सोडविल्याचा उल्लेख केला आहे तो खरा असावा. 'नागपूरकर भोसल्यांचे कागदपत्र' लेखांक २ रा ह्यांत कोल्हटकरांची जी कैफियत आहे तींत बापूजीस हवशानें त्रास दिल्याचा उल्लेख आहे.