पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० व बाळंभट वैद्याचा मजकूर लिहिला, ऐशास हा राज्यभाराचा प्रश्न, आपण देवऋषी, यांत मन घालावें ऐसें नाहीं. त्याहीमध्यें ज्याचा धंदा त्याजकडे करार केला तो फिरवितां नये. येविसींचा सकळ अर्थ भेटी- अंती कळेल. श्रीचा प्रसाद पाठविला तो प्रविष्ट जाला. अत्यादरें स्वी- कार केला. बहुत काय लिहिणें, कृपा निरंतर असों दीजे हे विज्ञति. श्री. [ लेखांक ९१ ] तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारवाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. यानंतर हसा घिसाडी याचा कजिया होता तो मनास आणून विल्हेस लावावयाबद्दल तुझीं एकदोन वेळां लिहिलें, त्यास तुमच्या लिहिल्यावरून घिसाडी मजकूर तुझांकडे पाठ- विला आहे. त्याचा तुझीं इनसाफ करावा. तें न करितां त्याच्या पायांत बेडी घातली ह्मणून कळों आलें. ऐशास, आझी तुझांकडे पाठविल्यावरी तुझीं पायांत बेडी घालावी है अनुचित गोष्टी आहे. हल्लीं दरवाजाच्या इमारतीचें काम बंद झाले आहे, याकरितां घिसाडी हुजूर आणविला असे, तर पत्रदर्शनीं त्या समागमें आपणाकडील माणूस देऊन पाठवून देणें. हुजूर मनसुफी मनास आणून विल्हेस लाविले जाईल. पत्र- दर्शनी पाठविले पाहिजे. निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे, हे विनंति पै| छ० ८ सैफर सन खमस अवैन मया व अलफ. [ लेखांक ९२] श्री. - तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- - अपत्यं सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई दंडवत विनंति उपरी येथील १ छ० ८ सफर सन खमसअर्कैन : ता० ३१ मार्च इ.स. १७४५, रविवार