पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ [ लेखांक ८८ ] श्री. श्रीसकलतीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल पौष बहुल पष्ठी स्वामींचे आशीर्वाद यथास्थित असों विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र व श्रीचा प्रसाद संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते व आम्रफळे ६ सहा पाठविलीं तीं आज्ञेप्रमाणे स्वीकारली. वरकड वर्त- मान खंडोजी साळवी याचे शरीरीं अनारोग्याचें सांगितले त्यावरून रा० बहिरो रघुनाथ यांस सेवेसी पाठविले असेत. सविस्तरें याबद्दल वर्तमानाची आज्ञा निरोपिली पाहिजे, सेवेसी विनंति. [लेखांक ८९] श्री. श्रीसकलतीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विज्ञप्ति येथील कुशल वृत्त ता० शुद्ध तृतीया भानुवासर स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष बहुत दिवस आशीर्वादपत्रदर्शनाचा लाभ होत नाहीं, याक- रितां चित्त सापेक्षित असे, तरी कृपा करून सर्व आशीर्वादपत्रीं परामर्थ करावया स्वामी समर्थ आहेत. स्वामींच्या सेवेसी ऊर्ण वस्त्रे जोडी १ एक खंडोजी यादव हुजरे याजबरोबरी पाठविली आहे. कृपा करून घेतली पाहिजे. विनंति छत्रपतींच्या राण्या. श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- - [ लेखांक ९० ] - अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. यानंतर तुझीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें, लिहिले वर्तमान कळों आलें. पालखीच्या सरं- जामास गांव द्यावा ह्मणोन लिहिलें, ऐशास राजश्री स्वामींनीं एक चावर जमीन देणें ह्मणून करार केला आहे. पांगारे गांव देत नाहींत