पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ पुरवणी पत्रे. शाहूमहाराज. [लेखांक ८६] श्री. श्रीसकलतीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विज्ञप्ति. येथील कुशल वैशाख बहुल द्वितीया भृगुवासर यथास्थित असों विशेष स्वामींनी कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें, पाहून संतोष जाला. शरीरी सावकाश नाहीं हाणून ऐकतों ह्मणून लिहिलें, तरी ज्वराची कांहीं पीडा जाली होती; त्यास प्रस्तुत कांहीं सावकाश वाटतें. आपण श्रीची विभूति व तीर्थ पाठविलें तें वंदिलें या उपरी आरोग्य होईल. चिंता नाहीं. वरकड विस्तार संभाजी नारायण जबानीं सांगतां विदित होईल. बहुत काय लिहिणें. [ लेखांक ८७ ] - श्री. श्रीसकलतीर्थरूप श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विनंति उपरी मीर शिकार पांखरें धरून आणावयास पाठविले असेत. हे धरून आणतील. यांस स्वामीकडील दुसरे कोणी उपद्रव देतील त्यांस ताकीद केली पा हिजे. विनंति. - १ ही पत्रे मागील पत्रे छापून निघाल्यानंतर श्रीब्रह्मेद्रस्वामी यांच्या इनाम गां- बांपैकी पिंपरी येथील इनामदार श्रीमंत रा. रा. कृष्णराव पांडुरंग ऊर्फ आपासा- हेब भागवत यांचेकडून मिळाली आहेत. हीं मागील क्रमास अनुसरून पुरवणी- रूपानें येथे दिली आहेत. २ वैशाख बहुल द्वितीया भृगुवासरः ता० २९ एप्रिल इ. स. १७४३, शुक्रवार.