पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ रघुनाथ बाजीराव. श्री. श्रीमत् श्री परमहंसबाबा स्वामींचे सेवेसी: चरणरज रघुनाथ बाजीराऊ कृतानेक सा० नमस्कार विनंति स्वा- मींच्या कृपावलोकनेंकरून आशीर्वादप्रभावें माघे वद्य १२ पर्यंत वर्त- मान यथास्थित असे विशेष. तीर्थस्वरूप रात्रश्री नाना यांची स्त्री सौ- भाग्यवती मातुश्री गोपिकाबाई वहिनी माघ वद्य एकादशी सहद्वादशी मंदवारीं प्रातःकालींच्या अकरा घटिका दिवसास प्रसूत होऊन पुत्र जाहला. स्वामींचे आशीर्वादाचें फल आहे. सर्वोस संतोष जाहला. संतोषवृत्त स्वामींचे सेवसी विदित व्हावें याकरितां पत्र पाठविलें आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ८५] - १ माघ वद्य १२ : - ता० १७ फेब्रुवारी इ. स. १७४५. रविवार. २ छ० २५ मोहरम ता० १६ फेब्रुवारी इ. स. १७४५ रोज शनिवार अकरा घटिका दिवसास गोपिकाबाई प्रसूत होऊन थोरले माधवराव पुत्ररल निपजलें, त्यांची मकर रास होती.