पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ कियाविषयीं स्वामींनीं आज्ञा केली, ऐशियास प्रस्तुत येथें ओढीचा प्रसंग असे तो काय ल्याहावा ! स्वामींनीं पैकियाविषयीं चार महिने कृपा करावी. तीर्थरूप राजश्री नाना स्वारी करून आलियावरी स्वामी आज्ञा करतील त्याप्रमाणें वर्तणूक करतील. सारांश, हा मामला स्वा- मींच्या आशीर्वादाचा आहे. उभयतां तीर्थरूप असतां यथास्थित चा ललें, त्याप्रमाणे किंबहुना त्याहून विशेष चालावें हें स्वामींस आवश्यक आहेच. स्वामीही कृपा करणें ते करतील व करावी [ हें ] उचित असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ८४ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० माघ शुद्ध त्रयोदशीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जा हला. घोडी फिरोन पाठविली आणि पैशाची आज्ञा केली, पैका न पाठविला, त्याजवरून कितेक उदासीनतेनें आज्ञा केली; ऐशास स्वामी ईश्वरस्वरूप आहेत. स्वामींच्या चरणांजवळ तीर्थरूप व आह्मी निष्ठा- पूर्वक वर्ततों स्वामी परंपरागत कृपा करीत आले आहेत. ततोप्यधिक कृपा संपादून घ्यावी हेच इच्छा तीर्थरूपांची आहे. घोडी स्वामींस उत्तम द्यावी यापरतें अधिकोत्तर काय आहे? घोडीचा विषय तो काय आहे ? स्वामींच्या आज्ञेपेक्षां अधिक नाहीं. तीर्थरूप आलियावर लक्षप्रकारें घोडी देतील, हे दौलत संपदा सर्व स्वामींचे आशीर्वादाची आहे. आह्मी स्वामींचे आज्ञांकित असो. वरकड आपले वार्धक्यपणाचा अर्थ लिहिला तरी स्वामींचें पुण्यशरीर आहे. स्वामींचे मागें आझी सर्वही आज्ञां- कित आहों. आपले आज्ञेनुरूप सर्वही घडेल. सारांश, आझी स्वा- मींचीं लेंकरें असों सदैव आशीर्वादपत्री परामर्ष करीत जावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. -