११५ [ लेखांक ८२ ] * श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल चैत्र शुद्ध अष्टमीपावेतों स्वामींचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. कित्येक रा गेजोन लिहिलें तें कळलें. ऐशीयास, स्वामी आह्मांस सर्वप्रकारें वडील; स्वामींच्या पायाविना दुसरें दैवत नाहीं. कैलासवासी वडिलांवरी स्वा- मींनीं कृपा केली, तैसीच कृपा स्वामी आह्मांवरही दिवसेंदिवस अधिक करतील ऐसा पूर्ण भरंवसा स्वामींच्या पायांचा असतां, स्वामींनीं यद्यपि रुष्टतेनें लिहिलें तत्रापि तीं स्वामींचीं प्रसादवचनें सेवकास श्रेयस्कर आहेत. प्रस्तुत स्वामीकारणें वस्त्रे पाठविलीं आहेत:- - दुपेटा चांदणी पैठणी किनारा आस्वली १ पासोडी पैठणी १ किनखाब बेलदार १ शालजोडी १ येणेंप्रमाणें चार वस्त्रे सेवेसी पाठविली आहेत. कृपा करून अंगी- कार केला पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. . [ लेखांक ८३ ] श्री. श्रीमत् महाराज राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- H- - चरणरज सदाशिव चिमणाजी साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल माघ शुद्ध पंचमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असों विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें शिरसा वंदिलें. पै-
- लेखांक ८२१८३१८४ ह्या पत्रांच्या मिती, वार न दिल्यामुळे बरोबर ला
वितां येत नाहीत. लेखांक ८४ ह्या पत्रामध्ये स्वामींनी वार्धक्याचा उल्लेख केला आहे, त्यावरून ते इ. स. १७४४ किंवा इ. स. १७४५ ह्या दोन सालांतले ह्मणजे अखेरचे असावें असें अदमासानें ह्मणतां येईल.