पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ न्नास, वस्त्रें दोन, आणावयास जासूद पाठविला असे. येतील ते क्षण सेवेसी पाठवून देतों. पालकीविशीं विषदें आज्ञा केली, त्यास पालकी उत्तम तबकडी सामान तयार करविलें आहे. आझी इकडे आलों या गलबलीमुळे रवाना करितां राहिली. अतःपर आझी अतःपर आझी पुण्यास येतेक्षणीं पालकी सेवेसी पाठवून देतों. स्वामींच्या आज्ञेपेक्षां आझांस विशेष काय आहे ? कुलाबीयाकडून स्वारी करून आलों तन्मुळे वाट सरली, तरी वाटेचें औषध पाठविणें झणोन आज्ञा, त्यास आह्मांबरोबर वैद्य नाहींत. पुण्यास वैद्य आहेत. वाटेचें औषध स्वामींचे सेवेसी पाठविण्याविसीं राजश्री जिवाजी गणेश यांस लिहिले आहे. ते वैद्यापासून औषध घेऊन सेवेसी पाठवितील. वारुगडाखाली तळें खणावयाचे काम लाविलें आहे तरी तुझांकडे श्रीचें कैर्ज आहे त्याचें व्याज एक वर्षाचें रुपये ८,१०० आठ हजार एकरों पाठवून देणें ह्मणोन लिहिलें, तर स्वामींची आज्ञा ते शिरसा ( वंद्य ), परंतु यंदाचा विचार आहे तो सेवेसी विदित असे. त्याहीमध्यें हिशेब कितेच कुल तीर्थरूपांबरोबर गेले आहेत. तीर्थ- रूप दोना महिन्यांनी माघारे येतील आणि स्वामींनीं लेहून पाठवावें. आह्मी येविशीं तीर्थरूपांस विनंति करणें ती करूं. स्वामींचे सेवेसी आह्मी अंतर करूं ऐसें नाहीं. सारांश, स्वामींची सेवा सर्वदा घडावी यापरतें दुसरें अभीष्ट समजत नाहीं. प्रस्तुतही आशेप्रमाणें तीर्थरूपांस लिहिलें आहे. तीर्थरूप येत तो कृपा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ● - १ श्रीचें कर्ज: – श्रीभार्गवरामाच्या नांवें स्वामींचें पेशव्यांकडे कर्ज होते त्याचे एका वर्षांचे व्याज ८१०० रुपये झाले त्यावरून कर्जाचा अदमास करितां येईल. एवढी मोठी रक्कम स्वामींनी अडचणीच्या प्रसंगी पेशव्यांस दिली ही लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे.