पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ [ लेखांक ८१ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः— चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० माघ बहुल तृतीया इंदुवासरेपर्यंत स्वामींच्या आशीर्वाीदेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. पत्र पाठवीत नाहीं व वर्तमान लिहित नाहीं, तुमचे वडील कोणे तऱ्हेनें वर्तत होते ह्मणून कितेक शब्द लावून आ- ज्ञापिलें, ऐशास स्वामींचे चरणारविंद अहर्निशीं चित्तांत आणून स्वामींचे पाय दैवत समजतों. तेथें स्वामींस पत्र न लेहूं हैं कैसें घडेल ? गंगास्ना- नाचे उद्देरों खार जाहलों, घोडनदी उतरली; यावरी शरीरीं ज्वरादिक पीडा प्राप्त जाहली; दहावीस रोज श्रमी केलें. प्रस्तुत स्वामींच्या आ शीर्वादेंकरून आरोग्य आहे. व्यथेमुळे स्वामींस पत्र गेलें नाहीं तरी स्वामींनीं लेंकरावर कृपा करून क्षमा केली पाहिजे. मी सर्व प्रकारें चर- गरज स्वामींचा आहे. स्वामींनी आपले ह्मणवून अभयहस्त मस्तकीं ठेविला आहे तेविषयींचा अभिमान स्वामींस आहेच. तेथें आह्नीं विस्तारें विनंति लिहिजेसी नाहीं. बापुजी मेघश्याम याजकडे रुपये ५० पन्नास व रामचंद्रपंत मु० पिंपळनेर दिमत कवडे याजकडे रुपये ५० पन्नास व दोन वस्त्रें आणवून पाठविणें ह्मणोन आज्ञा तर बापुजी मेघश्याम ती- र्थरूप राजश्री नानाबरोबर आहेत. येविसीं तीर्थरूपांस लिहिले आहे. ते रुपये घेऊन पाठवितील. रामचंद्रपंत पिंपळनेरकर याजकडील प - १ माघ बहुल तृतीया इंदुवासरः - ता० ३१ जानेवारी इ. स. १७४३. २ गंगास्नानाच्या उद्देशाने सदाशिवराव भाऊ पुण्याहून छ० ३ जिल्काद ह्मणजे ता० २० दिसेंबर इ. स. १७४२ रोजी निघाले, ते गंगास्नान करून छ० १० मोहरम ह्मणजे ता० २४ मार्च इ. स. १७४३ रोजी पुण्यास परत आले. भाऊसाहेबांच्या बरोबर रघुनाथराव व जनार्दनपंत हेही होते. ८