पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ आज्ञा दिल्ही आहे तरी हें सर्व स्वामींच्या आशीर्वादाचें [फल ] आहे. येथील न्यून पूर्ण करावें हें स्वामींस अगत्य, तेथें आह्मांस चिंता काय आहे ? हेमगर्भ दोन तोळे उत्तम पाठविणें ह्मणोन आज्ञा, तर हेमगर्भाचा यत्न फार केला, परंतु चांगला न मिळे; तथापि एकापाशीं हेमगर्भ उत्तम पा- हून अकरा मासे पाठविला. सेवेसी प्रविष्ट जाहलियाचें उत्तर पाठवावें. टोप्यांस मखमल तीन गज व गुळ वजन पक्का तीन मण नारायण गांवचा पाठविणें हाणोन आज्ञा, तर मागाहून पाठवून देतो. नारायण गांवास यंदा ऊंस जाहला नाहीं, सर्वत्र पर्जन्यानें घालविलें, स्वामीं- सही विदित आहे. परंतु स्वामींचा गुळ दिल्हा पाहिजे. त्यास रा जश्री सदोबापासून देवविला आहे. घेतला पाहिजे. मखमल गज ३ तीन रेशमी पाठविली आहे. सेवेसी प्रविष्ट जाहल्याचें उत्तर पाठ- वावें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ८० ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० श्रावण शुद्ध तृतीया भृगुवारपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. ती० राजश्री नाना यांस श्रावण शुद्ध द्वितीया गुरुवारीं दोन घटका दिवस बाकी असतां पुत्र झाला. हे संतोषाचें वृत्त स्वामींस कळावें याजकरितां लिहिले आहे. वरकड तीर्थरूपांकडील पत्रे आलीं तीं सेवेसी पाठविलींच आहेत. सर्वदा आशीर्वादपत्र सांभाळ करीत गेलें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. - - १ श्रावण शुद्ध तृतीया भृगुवारः - ता० २३ जुलई इ. स. १७४२ शुक्रवार. २ श्रावण शुद्ध द्वितीया गुरुवार : - ता० २२ जुलई इ. स. १७४२ गुरुवार, ३ हा पुत्र विश्वासराव. हा पानिपतच्या लढाईत मारला गेला.