पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ जवरून घांटा व पेट्या दोन रा० जगजीवनपंत याजबरोबर पाठविल्या असेत; सेवेसी प्रविष्ट जाहल्याचें उत्तर पाठविले पाहिजे. तीर्थरूप कैलासवासी आपांनी स्वामींजवळ दोन घांटा व दोन पेट्या द्यावयाचें मान्य केलें तें वचन अन्यथा कैसें होईल ? सर्व स्वामींचा आशीर्वाद आहे. तत्प्रभावें- कडून केल्या वचनास अंतर होणार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ७९ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० ज्येष्ठ बहुल सप्तमी इंदुवारपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. “तुळाजी आंगरे याजवर श्रीचा कोप जाहला. त्याचा विनाशकाल आला. नागोजी आंगरे यांनीं जयवंतगड व अंबेकवसाठवलीची गढी घेतली. आझी पालगड रसालगड घेणें. श्री तुझांस यश देतच आहे" ह्मणोन आज्ञा, त्यास स्वामींचा कोप मशारनिल्हेवर जाहला तेच समयीं त्यास विनाशकाळ प्राप्त झाला. नागोजी आंगरे यांणीं तीन जागा घेतलियाचें अपूर्व नाहीं. जे जे स्वामींच्या चरणाजवळ मूर्ख वर्ततील त्यांची गत याचप्रमाणे आहे. पालगड रसालगडाविसी आज्ञा केली, "श्री तुझांस यश देतच आहे. काय करणें तें स्वामींची आज्ञा, शिरसा ( मान्य ) आहे. जे स्वामी चित्तांत आणतील तें करतील. या गोष्टीचा चमत्कार पाहावा असें नाहीं. पांढऱ्याकडील ठाण किती घेतलीं तें लिहिणें ह्मणोन आज्ञा तर ठाणें बाबळे व मोडनिंबोणें करमळ्यापासून तिही तिही कोसांवर ठाणीं आहेत. विदित जाहलें पाहिजे. पांढरे स्वामींचे आशीर्वादेंकरून हतवीर्य जाहले. तीर्थस्वरूप राजश्री नाना यश पाऊन येतील ह्मणोन स्वामींनीं ● १ ज्येष्ठ बहुल सप्तमी इंदुवारः - ता० २४ इ. स. १७४२. - -