पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● १२ राजांचे कारकीर्दीचा चुना आणवून देवालयाचा कारखाना ज्यारीने चालविला. स्वामी चतुर व मनुष्याची परीक्षा करण्यांत फार दक्ष असल्यामुळे त्यांनीं चिमणाजीपंताच्या प्रामाणिकपणाबद्दल व शुद्ध भावाबद्दल आपली खात्री करून घेतली आणि त्यास आपला आश्रय देऊन त्यास चार रुपये दरमहा करून आपल्या देवस्थानाच्या पोतदारीचं काम सांगितलें. बापूजीपंत लिहिण्याच्या कामावर होते. त्यांस पांच रुपये दरमहा करून फडणिशीचें काम सांगितले. नंतर त्यांनी चिमणाजीपंतास धोंडोपंत सप्रे ह्यांची कन्या देऊन लग्न केलें. ह्याप्रमाणे उभयतांवर प्रेम करून स्वामींनी त्यांना नांवारूपास आणिलें. पुढे स्वामींचा कारखाना वाढत चालला व बापूजीपंतांस काम फार पहूं लागले. ह्मणून त्यांनी त्यांचे बंधु धोंडो भास्कर तांबे, कल्याण प्रांतांतील हशमी सर- दार गौरोजी लाटे(?) ह्मणून होते त्यांचे पदरीं होता, त्यास आणवून चिटणिशीचं काम दिलें. ह्याप्रमाणे बापूजीपंत, चिमणाजीपंत, व धोंडोपंत असे त्रिवर्ग एकरूपें, एका मायेनें, स्वामींच्या सेवेंत तप्तर राहिले. स्वामींच्या देवस्था- नाचा जसजसा उत्कर्ष होत चालला तसतसा स्वामींनी ह्या त्रिवर्गाचा उत्कर्ष केला. हे पुढील वृत्तांतावरून समजून येईलच. भाग २ रा. कोंकणप्रांताचा त्याग आणि महाराष्ट्रदेशांत आगमन. ब्रह्मद्रस्वामी अरण्यामध्ये एकांत स्थानीं तपश्चर्या करीत बसण्याचें आपले व्रत एकीकडे ठेवून, प्रसिद्धपणे परशुरामी राहूं लागले; व देवालयाचा जीर्णोद्धार करावयाचा निश्चय करून तत्प्रीत्यर्थ द्रव्य व इनामगांव मिळविण्याचा यत्न करूं •लागले; हे वाचून कोणास अशी शंका उत्पन्न होईल कीं, ही एवढी उपाधि स्वीका रण्याचें स्वामींस प्रयोजन काय? ह्याचें उत्तर स्वामींची स्वधर्म व स्वराज्य ह्यां-