पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० ● रुपये पाठविले, आणखी नाहीं ह्मणतात, तर त्यास लिहून तीन हजार आणवून पाठवणें ह्मणोन आज्ञा; त्यास स्वामींची आज्ञा अमान्य करीसा कोण आहे ? परंतु तेथील विचार ह्मणावा तर सालांत लोकांस चार महिने पावले. त्यांतच कापड अडसेरीवर मात्र चाकरी करितात. त्याजपासून रुपया मागावयासच बोलतां नये. तथापि मशारनिल्हेंनी स्वामींचे आज्ञे- प्रमाणें दोन हजार रुपये पाठविलेच आहेत. अतःपर स्वामींनी त्यांज- वरी कृपा करावी. स्वामींचे आज्ञांकित आहेत. हरएक समयीं त्यांची सेवा न घडेसी नाहीं. कृपा करणार महाराज समर्थ आहेत. " खंडू खोल्या शिंपी संगमनेरकर धावडशीस राहतो. यास आह्मीं पांच हजार रुपये कर्ज दिल्हे. त्याची निकड त्यास लाविली. त्यानें संगमनेरास अकराशे रुपयांचीं कुळें लिहून दिली आहेत. तरी सादतखानास पत्र व शाहणा माणोस शिपाई पाठवून सदरहू रुपये वसूल करून आणून पा टवणें" ह्मणोन आज्ञा; तर आज्ञेप्रमाणें संगमनेरास माणसें वसुलास पाठवून देतों व सादतखानास लिहून पाठवितों परंतु तेथील वि चार आहे तो सोमाजी स्वामींचे सेवेसी विदित करील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ७८] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० वैशाख शुद्ध त्रयोदशी गुरुवासरेपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं घांटा व पेट्यांविसीं आज्ञा केली होती त्या- . - १ सादतखानः – संगमनेर जिल्हा अहमदनगर हा प्रांत त्या वेळी निजामाकडे असल्यामुळे सादतखान मोंगलांच्या तर्फे कोणी अधिकारी तेथें असावा असे दिसतें. ● २ वैशाख शुद्ध त्रयोदशी गुरुवारः – ता० ६ मे इ. स. १७४२. -