पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[लेखांक ७७ ] श्री. ● ● श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः— चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता० चैत्र शुद्ध दशमी बुधवारपर्यंत स्वामींच्या आशी- र्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. "घोड्यावरून तुझी पडोन हात दुखवला होता, यास्तव चित्त सचित जाहलें होतें. त्यास तुझांस समाधान वाटोन पुण्यास आलेसें ऐकून संतोष जाहला. तुझांस वैज्रकवच पाठविलें आहे. स्वारी चाकरीस अंगीं घालीत जाणें" ह्मणोन कितेक आज्ञा केली. ऐसी- यास आमची सर्वप्रकारें चिंता स्वामींस आहे. स्वामी ईश्वरस्वरूप. स्वामींची कृपा आह्मांवर पूर्ण आहे. तदन्वयेंच प्रात जाहला श्रम स्व- ल्पसाहासें व स्वामींच्या स्मरणमात्रें परिहार होतो, व जाहला. आ- झांस स्वामींच्या चरणांविना दैवत दुसरे काय आहे ? पिंपळनेरकर रामचंद्र हरी कारकून दि ॥ कवडे यानें रुपये ५० पन्नास व वस्त्रे दोन देऊं केलीं तीं आणवून पाठवणें ह्मणोन आज्ञा, त्यास मशारनिल्हे कडे माणोस पाठऊन सदरहू आणून सेवेसी पाठवूं. महाराजांनीं पालकी दिल्ही, पालकींत बसविलें ह्मणोन, तरी स्वामींस पालकी दिल्ही याचें अपूर्व काय आहे ? स्वामी थोरच आहेत. देवाची पालकी सामानमुद्धां पाठवणे ह्मणोन आज्ञा, त्याजवरून पालकी सामानसुद्धां सोमाजीबराबर पाठविली असे. सामानाची याद अलाहिदा असे. त्याप्रमाणें पालकी पावलीयाचें उत्तर पाठवावें. रा० शंकराजी केशव ह्यांनी दोन हजार . १ चैत्र शुद्ध दशमी बुधवारः - ता० २६ मार्च इ. स. १७४०. - - - २ वज्रकवचः – स्वामी पेशव्यांस निरनिराळे युद्धप्रसंगाचे पोषाक पाठवीत असत. ते प्रासादिक समजून लढाईच्या वेळीं पेशवे ते परिधान करीत असत. वज्रकवच ह्मणजे शिरस्त्राण असावें अर्से दिसतें.