पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ स्वामी घेतील, ते देतील. स्वामींची आज्ञा उल्लंघन करीसा कोण आहे ? परंतु कोंकणच्या प्रजेची उपजीविका सर्व मेहनत करून भाजावें, कष्ट करावे, तेव्हां फळात्कारास येतें. यंदा पर्जन्य चैत्रमासापासून पडूं ला- गला, तन्मुळे राबराबाट प्रजेचें भाजितां राहिलें. किंचित् राव केलें, पेरलें, त्यास अलीकडे पाऊस नाहीं. याप्रकारें रयतेची अवस्था आहे. सर्वजाण स्वामी आहेत. प्रजा स्वामींची व आझी स्वामींचे असो. स विस्तर अर्थ तीर्थरूप राजश्री नानांस लिहिला आहे. तेथून उत्तर आल्याउपरीं स्वामींचे सेवेसी लिहून पाठवू. आझी लेकरें स्वामींचीं. आमचा सर्वप्रकारें सांभाळ करावयास स्वामी समर्थ आहेत. हा मामला दौलत सर्व स्वामींची आहे. स्वामींच्या चरणांजवळ दुसरा भाव आ मचा तिळतुल्य नाहीं. स्वामींचा अभयहस्त आमच्या मस्तकीं आहे. त्यास आणिकासारिखें स्वामींच्या चित्तांत येणेंच नाहीं. "सयाजी कनोजे बास पांचशे रुपये द्यावयाचें वचन नानांचें आहे. त्याच्या मुबदला गो- विंद केशव पाठविला आहे, याची उपेक्षा न करणें. तुझी ह्मणाल कीं हुद्दा सांगणें अगर वेतन देणें तें नानांचे हातीं, तर नाना येत तंवर आपणाजवळ यास ठेऊन रोजमरा देणें, पुढें नाना आल्यावर हुद्दा सांगणें तो सांगतील" ह्मणोन आज्ञा; तर स्वामींच्या आज्ञेप्रमाणे गोविंद केशव यास ठेऊन घेतलें. रोजमरा आज्ञेप्रमाणे देत जाऊं. दोनशे बैलांचे दस्तक व चाळीस खंडी मिठाविषयीं आशा केली त्यावरून द स्तक व मिठाची सनद पाठविली आहे. सेवेसी प्रविष्ट होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. १ स्वामींच्या कोठीचे दोनशें बैल असत. ते देशांतून कोकणांत जाऊन मीठ बगैरे पदार्थाचा व्यापार करीत असत. त्यांच्यावर कोठेंहीं जकात पडूं नये ह्मणून सरकारांतून दस्तक ह्मणजे हुकूम मिळत असे. मोंगल व हबशी ह्यांच्या राज्यां- तही स्वामींच्या बैलांस मुभा असे.