पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ सदाशिव चिमणाजी ऊर्फ भाऊसाहेब. [ लेखांक ७६ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक विज्ञापना येथील कुशल तागाईत भाद्रपद बहुल षष्ठी बुधवारपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र सोमाजीबराबर पाठ- विलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. पसमी थानें आझांकरितां पाठ- विलीं तीं आह्मांयोग्य नव्हेत ह्मणोन फिरोन पाठविलीं असेत घेऊन उत्तम वस्त्रे पाठवणें, ह्मणोन कितेक आज्ञा केली. ऐसीयास स्वामींचे आज्ञेपेक्षां आझांस अधिकोत्तर काय आहे? परंतु समयीं तींच थानें होतीं, तीं पाठविलीं होतीं. स्वामींच्या चित्तास न आलीं, फिरोन पाठ- विलीं, उत्तम केलें. हल्लीं उत्तम पसमी थानें ४ चार सोमाजीबराबर पाठविलीं असेत. घेऊन उत्तर पाठविले पाहिजे. "बरवाजी ताकपीर यानें आमची हेलणा केली आहे. अतःपर कल्याणची स्वारी नेमिली आहे. घराचें घर व परगण्याचा परगणा सोडणार नाहीं. यामुळे तुझांवर कृपा अथवा कोप होईल. श्री तुझांवर संकटीं पावतो आणि तुझी आ- झांसीं दोन भाव धरितां हें उत्तम नसे. कल्याण, भिवडी, साष्टी येथील भिक्षा रुपये पांच हजार पाठवून देणें" झणोन आज्ञा; त्यास स्वामी ईश्वरस्वरूप, स्वामींची हेलणा करीसा पृथ्वींत तो कोणी नाहीं. तेथें बरवाजी ताकपीर यांनीं स्वामींची हेलणा करावीसें त्याचें सामर्थ्य काय आहे ? कल्याण, भिवडी प्रांतें जाऊन घराचें घर व परगण्याचा परगणा सोडवणार नाहीं म्हणोन तर संपूर्ण प्रजा स्वामींची. त्यामध्यें कोंकणप्रांतची प्रजा केवळ स्वामींच्या कच्च्या धाग्याची त्याजपासून १ भाद्रपद बहुल षष्ठीं बुधवारः - ता० १२ सप्तंबर इ. स. १७३९. . -