पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ [ लेखांक ७४ ] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना ता० छ० २८ जमादिलावल पावेतों महाराजांचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष स्वा मींनीं कृपा करून पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान सविस्तर कळलें, पांच हजार रुपये व्याजाचा मजकूर लिहिला तरी व्याजाचा हिशेब एकंदर केला त्यामध्यें पांच हजार रुपयाचें व्याजाचा आला आहे. तें वृत्त रा० जगन्नाथ चिमणाजी यांस ठावकें आहे. त्यांपैकी दोनशें वीस रुपये पाहिजेत तरी तसेंच लिहून पाठवावें. रुपये पाठवून देऊं. उदेपूरचे सनदेविसीं लिहिलें तरी जुनी सनद पाठवून द्यावी. त्याप्रमाणें नवी सनद ज्याचे नांवें पाहिजे त्याचे नांवें पाठवून देऊं. समाधीमध्ये तुझांवांचून निजध्यास नाहीं, तुमचें मन साक्षीस येईल तेव्हां खरें, ह्मणून लिहिलें तरी स्वामींचे मनांत आमचा निजध्यास आहे. स्वामींची दया पूर्ण आह्मां- वरी आहे, तन्मुळें यश, कीर्ति, लौकिक उत्तम प्रकारें होतो हैं पुरतें आमचे प्रत्ययास आले आहे. स्वामींखेरीज आह्मांस अन्यत्र दैवत नाहीं. आमचा निजध्यास रात्रंदिवस स्वामींचे पायासींच आहे. दुसरा अर्थ किमपि नाहीं. स्वामींचाही आमचे ठायीं दुसरा विचार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ७५ ] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसचावा स्वामींचे सेवेसीः— चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना ऐशी जे, स्वामींनीं चिठ्ठी पाठविली तेथें कित्येक खेदयुक्त पर्याय लिहिला, तो कळला. ऐशियास आझी स्वामींचीं लेंकरें; आह्मांस इतके पर्याय स्वा- मींनीं लिहावे हे काय आहे? आह्नीं स्वामीखेरीज आहों असें नाहीं. जशी आमची निष्ठा पायांशीं असेल तदनुरूप फल [मिळेल]. पत्रीं काय ल्याहावें हे विज्ञापना.