पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५ तिच आह्मी करीत नाहीं. स्वामींजवळ बोलावें ते सत्यप्रतिज्ञ बोलावें या अन्वयें विनंति करितों. सयाजीस निव्वळ पांचशे रुपये व दोन वस्त्रे पाठवूं. सयाजींनीं वसईस राजश्री शंकराजी केशव यांजपासीं चाकरी करावी. ते त्याचें चालवितील, सारांश, आझी लेंकरें स्वामींचीं; आह्मांवरी स्वा- मींची दया पूर्ण आहे ती दिनप्रती नें विशेष करून घ्यावी हें कायावाङ्मनसा चिंतीत आहे. तदनुरूप श्रीकृपें घडेल स्वामींनीं सयाजी कनोजे यास समाधान करून अति सत्वरें पाठविले पाहिजे. सारांश, लहानसहाना गोष्टीसाठीं लेंकरावर राग मनांत आणावा असें नाहीं. आझी सर्व प्रकारें स्वामींचीं लेंकरें आहों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ७३] श्री. - श्रीमंत महाराज राजश्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कु- शल ता० छ मोहरमपर्यंत स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. याच रीतीं सदैव आशीर्वादपत्रीं सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. कि- त्येक आशीर्वादपत्री आज्ञा लिहिली तरी स्वामींचे आज्ञेविरहित दुसरा विचार काय आहे ? कर्जाबाबत तूर्त दहा हजार रुपये पाठवून द्यावया- विसीं आज्ञा व पाचा आठ व मोहरा आठ पाठविणें ह्मणून आज्ञा, तरी दहा हजार रुपये स्वामींस प्रविष्ट करावे ह्मणून चिरंजीव राजश्री सदोबास पुण्यास लेहून पाठविलें आहे. ते पाठवितील. कदाचित् त्यास अनुकूल न पडेल तरी येथून तरतूद करून सदरील ऐवज स्वामींस प्रविष्ट होईसारखा करूं. यास अंतर न पडे. पाचा व मोहरांविसीं तरी आझी स्वारीहून पुण्यास आल्यानंतर [करूं]. स्वामींचे आशेविरहित दुसरी जोड काय आहे ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ● ●