पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ दिवशीं कृष्णातीरीं समाधीस जाऊं ह्मणोन आज्ञा, तर उत्तम आहे. श्रीचें वार्षिकच आहे. स्वामी संपादतील. नरसो माणकेश्वर हातगांवकर याचेविर्सी आज्ञा केली तरी त्यास पाठवून द्यावें. धंदा सांगून चालवूं. येसू मेखर शिंपी याजकडील कर्जाची आज्ञा केली त्यास ताकीद केली आहे. स्वामींकडील कर्ज त्याचे वस्तु ठेववते असें नाहीं. लवकरच चारून देईल. हस्तीदाताविसीं राजश्री दादोबास आपण आज्ञा केली त्याजवरून तलास करून संग्रहीं होता तो वजन पक्के ८८४ चार शेर पाठविला आहे. पावलियाचें उत्तर पाठविले पाहिजे. स्वामीयोग्य ग रोब घोडा मेळवून सेवेसी पाठवितों हे विज्ञापना. [लेखांक ७२ ] श्री. श्रीमंत महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कु- शल ता० कार्तिक बहुल त्रयोदशीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट हो- ऊन संतोष जाहला. राजश्री सयाजी कनोजे याचेविसीं स्वामींनीं कितेक आज्ञा केली त्यांत मुख्यार्थ हाच की सयाजीस सातसें रुपये निव्वळ पावणें, कडें व दोन वस्त्रे देणें, कोणें जागा चाकरी करणें तो जागा नेमून पाठविणें ह्मणजे सयाजीस पाठवूं झणोन आज्ञा, त्यास स्वा- मींचे आज्ञेपेक्षां आह्मांस जोड काय आहे ? व सयाजी कनोजा पदरीं बाळगून त्याचें चालवावें ऐसाच तो मनुष्य आहे. लक्षप्रकारें चालवूं. परंतु आपण सातसें रुपये निव्वळ व कर्डे व दोन वस्त्रे लिहिलीं या हिशेबें हिशेब फार होतो. आमच्या हशमांत इतकी तैनात कोणासही नाहीं. स्वामी ईश्वरस्वरूप, स्वामींची आज्ञा परमवंद्य मानोन पांच सें रुपये स्वामींस विनंतीं लिहिले तेच बहुत आहेत. स्वामींचे चरणाजवळ बहुत बोलावें आणि नव्हेसें जाहलें तर स्वामींसीं शब्द लावावा अशी विनं- -