पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ [ लेखांक ७० ] * श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० अश्विन बहुल अष्टमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. रंगोबा कि अकलेकर यांची स्थापना पूर्ववत्प्रमाणे करणें झणोन . आज्ञा, ऐशीयास स्वामींचे आज्ञेपेक्षां विशेष काय आहे. इनसाफाचे सबब जें वाजवी होईल तें लक्षप्रकारें करूं हे विज्ञापना. - [ लेखांक ७१ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० आषाढ बहुल पंचमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून य- थास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन परम संतोष जाहला. टाकण घाडला तो कार्याचा नाहीं, याजकरितां पाठविला असे; तरी ठेवून मोबदला बसावया योग्य घोडे पाठवि ह्मणोन आज्ञा, त्यास स्वामींनीं टाकण पाठविला तो पावला. स्वामींच्या मर्जीस येई असें घोडें योजून मागाहून पाठवून देतों स्वामीचित्तास येई ऐसीच घोडी पाठवूं. स्वामींनीं रुपयांचा संक्षेप आज्ञा केली कीं लोकांकडील तुझीं देविले तेच मान्य केले, परंतु तुझी आमचें वचन मोडितां याजवरून विपर्यास वाटतो ह्मणोन, तर स्वामी आझांस ईश्वर- स्थानीं आहेत. आझी स्वामींचें वचन मोडूंसें काय आहे? मी स्वामींचें लेकरूं आहे. सर्वप्रकारें कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. आठीदहा ● -

  • लेखांक ७०।७१।७२|७३।७४।७५ ह्या पत्रांच्या मिति, वार न दिल्यामुळे,

बरोबर निश्चित करितां येत नाहींत.