पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ कुशल ता० अधिक शुद्ध ११ एकादशीपर्यंत स्वामींच्या आशीर्वा देंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. स्वामींनीं चरणरजास कितेक आशीर्वाद- पत्रीं गौरवून आज्ञा केली, तरी मी र्लेकरूं स्वामींचें आहे. सर्व भूषण स्वामींचेंच आहे.. रंगोपंत अकलेकर याचे ज्यो- तिष कुलकर्ण करून देणें ह्मणजे काशींत मज रत्नाभिषेक केल्यासा- रखा होईल ह्मणोन आज्ञा, ऐ शास स्वामींचे आज्ञेपेक्षां विशेष काय आहे ? इनसाफाचे वाटेनें वाजवी होईल तें करूं. मध पांढरा वजन आदमण, फणसपोळी | पावशेर स्वामींनीं कृपा करून पाठविली ते पावली. रेशीम कांकडे ८ एकूण वजन पक्के ४४॥ अदसेर पाठविले असे; याच्या मुबदला मखतुल रेशीम पाठविणें ह्मणोन आज्ञा त्यास शोध येथें केला; मखतुल रेशीम उत्तम नाहीं. रेशीम मखतुल आलियावर पाठवून देऊं. ज्याचे मनसुचींत आमचें नांव आढळत जाईल त्यास आह्मांकडे पाठवावें, आझी मनसुश्री विल्हेस लावीत जाऊं ह्मणोन आज्ञा, त्यास आपले चाकराची मनसुबी असेल ते स्वामींकडे पाठवीत जाऊं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. १ अधिक शुद्ध एकादशी:- स्वामींच्या कारकीर्दीत इ. स. १७४० पासून इ. स. १७४५ पर्यंत अधिक महिने दोन येतात. एक अधिक श्रावण शके १६६३, व एक अधिक आषाढ शके १६६६. ह्यावरून पाहतां अनुक्रमें ता० १३ जुलई इ. स. १७४१ सोमवार, व ता० ९ जून इ.स. १७४४ शनिवार ह्या दोन मि तीस अधिक शुद्ध एकादशी पडते. ह्यांपैकी कोणती मिति निश्चित करावी हें संश- ययुक्त आहे.