पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैवस्ती अंक छ० १० जिल्काद मार्गशीर्ष शुद्ध ११ सन खमस अर्बेन मया व अलफ. १०३ GF D १०१ यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. घोडीविसीं आज्ञा केली त्यास स्वामींचे मजीप्रमाणें घोडी पाठविली आहे. चित्तास आलिया ठेविली पाहिजे. घांटेविसीं आज्ञा केली त्याजवरून खामींचे आज्ञेप्रमाणें घांट वसईहून देवविली आहे. येऊन पावेल. वरकड विहीर मौजे यवतास [१] होती तिचें काम लावलियाचा मजकूर विस्तारें लिहिला तरी स्वामी पुण्यवान् आहेत जें चित्तावर धरितील तें करतील. नारो राम यास तारापुरची मजमू आहे त्याचा नाश बहुत जाहला. त्याचेविस स्वामींनी कितेक आज्ञा केली तरी स्वामींचे आज्ञेपेक्षां अधिक काय ? परंतु नारो राम यास येथें पाठवून द्यावें. त्याचें वर्तमान मनास आणून त्यास ताकीद पाहिजे तसी देऊं. लक्ष्मण राम व गोविंद राम यांविसीं आज्ञा केली तरी स्वामींची ज्यावरी अवकृपा जाहली त्याचें इष्ट कर्धी होणार? स्वामी ईश्वरस्व- रूप आहेत. आझी आज्ञांकित असों घोडी रोड आहे हाणून स्वामी वाईट ह्मणतील तर न ह्मणावी. ताजी जाहलियावर कशी आहे तें दि- सोन येईल. कदाचित् वाईट निघाली तर सेवक सेवेतें येईल तेव्हां जशी मर्जी असेल तशी मिळवून देईल. स्वामींचे आशीर्वादेंकरून विजय मात्र उत्तमच होईल. सर्व प्रताप स्वामींचे कृपेचा आहे हे विनंति. ४९ [ लेखांक ६९] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः— चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील ... पुणे नगर वाचन मंदिर, पुणे ७ ८२१९० वर्ग ONO 1000000 -