पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ " स्वामींनी त्यास “चित्तांत कांहीं भय न धरणे. समुद्र तरणें आमची सहज वृत्ति असे. यांत कांहीं अगाध नाहीं.” असे अभयवचन दिले. खानानें स्वामींची समबुद्धि व थोरपणा पाहून त्यांचा फार गौरव केला. त्यांस किल्ल्यां- तील राजवाड्यामध्ये नेलें; त्यांच्या सन्मानार्थ तोफांची सलामी दिली; आणि त्यांस बहुमूल्य वस्त्रे अर्पण केलीं. स्वामींनींही त्यास प्रसाद दिला. स्वामींच्या मनांतून पेढें व आंवडस हे दोन्ही गांव आपल्या देवस्थानास इनाम असले ह्मणजे श्रीची पूजा-अर्चा व उत्सव महोत्सव निर्वेधपणे चालेल आणि मुसल- मानांचा त्रास देवस्थानास पोहोंचणार नाहीं. ह्मणून त्यांनीं खानसाहेबांकडून दोन्ही गांवच्या इनाम सनदा करून घेतल्या. त्याचप्रमाणे देवस्थानाच्या इमा रतीचा कारखाना चालू केला होता त्याची देखरेख करण्याकरितां बापूजीपंत तांबे ह्मणून एक कारकून मागून घेतला. ह्याप्रमाणे स्वामींनी आपल्या सद्गुणप्रभावानें व सप्रेम वर्तनानें याकूदखान ह्यावर छाप बसवून आपले इष्ट कार्य साधून घेतलें. ही हकीकत इ. स. १७०८ नंतर घडून आली. • ह्यानंतर एक वर्षाने बापूजीपंताची बहीण राधाबाई व तिचा पुत्र चिम- णाजी कृष्ण भागवत हे स्वामींच्या सेवेस परशुराम येथे येऊन राहिले. चिम णाजी कृष्ण यांचे वडील कृष्णाजी बहाळ व त्यांचे बंधु नारो बहाळ हे मौजे सोनवडे तालुके संगमनेर येथील कुळकरणाचे वृत्तीवर नांदत होते. कृष्णाजीपं- तास पुत्र एक, चिमणाजीपंत; व नारोपंतास पुत्र दोघे, संभाजीपंत व अंताजी- पंत. कृष्णाजी बहाळ व नारो वहाळ ह्यांचा काळ झाल्यानंतर संभाजीपंत व अंताजीपंत ह्यांनीं विभक्त संसार केला. परंतु चिमणाजी कृष्ण यांस पोटशूळाची व्यथा निर्माण झाल्यामुळे ते फार त्रस्त झाले. तेव्हां त्यांची सापल माता राधाबाई हिनें धामापूर नजीक देवरुख येथे येऊन देवाची सेवा केली. तेथें तिला दृष्टांत झाल्यावरून ती चिमणाजीपंतास बरोबर घेऊन बापूजीपंताचे विद्यमानें परशुरामास गेली. तेथें उभयतांनीं श्री स्वामींचें दर्शन घेऊन त्यांची सेवा चालविली. चिमणाजीपंतांचें व बापूजीपंतांचे नातें आहे असे समजून स्वामींनी त्यावर विशेष कृपा केली व त्याची पोटशूळाची व्यथा अगदीं नाहींशी केली. तदनंतर स्वामींनीं त्यांस आपल्या हाताखालीं घेऊन देवालयाचें काम काज सांगितलें व महिपतगडर्डी जाऊन शिवाजीमहा-