पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जीवें प्राणें स्वामींचे कार्यास हजीर आहे. जो स्वामींच्या चरणांजवळ अमर्यादेनें वर्तेल त्यास मर्यादापूर्वक वर्तवावयासच मजला स्वामींनीं ठेविलें आहे. येविसींची स्वामींनीं चिंता न करावी. मैकसुदाबादी टा- कण चलाख पाठविणें, व्याली घोडी पहिली तुझांस दिली तिचा मुब दला पाठविणें ह्मणोन आज्ञा, त्याजवरून चिरंजीव राजश्री सदोबापास टाकण चांगला चलाख होता तो जीन सामान सरंजाममुद्धां पाठविला आहे; स्वामींनीं ठेवावा. सारांश मी स्वामींचें लेकरूं; मजपासून अंतर कांहीं पडेल तरी आपण क्षमा करावी व कृपा करावी. हे सर्व सामर्थ्य स्वामींस आहे. चिरंजीव राजश्री जनार्दन याच्या लग्नाची त्वरा जाहली तो अर्थ पहिला सेवेसी लिहिलाच आहे. प्रस्तुत स्वामींस वस्त्रे कुडती बादली शालजोडी किनखाप १ १ १ एकूण तीन सनगें पाठविली असेत. कृपा करून घेतली पाहिजेत. बहुत काय लिहिणें, कृपा केली पाहिजे हे विनंति १. [ लेखांक ६८ ] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता० मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून १ मकसुदाबादी - मुर्शिदाबादी घोड्या फार चपळ अशी पूर्वी समजूत असावी. २ सदोबा: – सदाशिवरावभाऊ, चिमाजी आपांचे चिरंजीव. - , ३ मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी:- ता० २७ नोव्हेंबर इ. स. १७४४ मंगळवार. ह्या पत्राखाली पैवस्तीची ता० छ० १० जिल्काद मार्गशीर्ष शुद्ध ११ सन ख मस अर्कैन मया व अलफ (ता० ४ डिसेंबर इ. स. १७४४) ही बरोबर दिल्या- मुळे ह्या पत्राची तारीख सिद्ध आहे.