पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ , यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. स्वामींनीं बुद्धिवाद पुरस्सर मागील पुढील कुल गोष्टी पत्रीं लेखन करून विशदें आज्ञा केली व खंडोजी साळवी आला, त्यांणीं स्वामींची आज्ञा सांगितली त्यावरून सविस्तर कळले, ऐ- शीयास आझी स्वामींचीं लेंकरें; आझांस स्वामींच्या चरणारविंदावितरिक्त दुसरें दैवत नाहीं. स्वामी ईश्वरी अंश आहेत. आपल्या चरणांजवळ आमचा दुजा भाव नाहीं ह्मणोन प्रतिपत्रीं विनंति कायावाङ्मनसा स्वामींस लिहिले असतां स्वामी रुष्टभावें आज्ञा करितात या गोष्टीस आमचा उपाय काय ? तीर्थरूप कैलासवासी थोरले नाना व राव व आपण निष्ठापूर्वक श्रीसीं वर्तत आले त्यापेक्षां विशिष्ट विनीतभावें वर्तावें हीच इच्छा माझी आहे. दुसरा विचार असेल तर स्वामींच्या चरणाची शपथ असे. प्रसाद दिल्हा तो माघारा देणें ह्मणोन आज्ञा तर हे दौलत यत्किंचित् काडीपर्यंत स्वामींची आहे. स्वामींनी ठेविली, जतन करीन. पावशेर अन्न व वस्त्रपात्र उपभोग करितों तेवढेंच आमचें. वरकड सर्व स्वामींच्या आशीर्वादाचा प्रताप आहे. स्वामी उपरोधिक लिहितात तर वडील आहां. लेंकरूं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील ऐसें जाहलें नाहीं. स्वामीही करणार नाहींत. आझी अपराधी तरी स्वामींचेच. स्वामींविना दुसऱ्यास करुणा येणें अथवा आपले मु लाचा गौरव करणें हें सर्व स्वामींकडेच आहे. दुसऱ्यावरी आमच्या माणसाची सत्ता होती व तुझ्या + + + आमचे माणोस दुसऱ्यास मारीत होते त्याची छळणा तुझीं केली ह्मणोन, तर स्वामींच्या चरणा- जवळ माणसें चाकरी करितात व मजपाशीं लोक चाकरी करितात ते सर्व स्वामींचेच आहेत. मी स्वामींचा आज्ञांकित. तेथें व येथें सेवक आहेत ते सर्व माझेच समजतों. मीं आपले माणसास कांहीं एक गोष्ट सांगितल्यास स्वामींच्या दर्पास जपून होईल हे काय गोष्ट आहे १ मी , व