पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ पाहिजे. अपूर्व वस्त न पाठविली ह्मणून लिहिलें, त्यास यंदाचे स्वारीचा अर्थ विदित आहेच. तथापि स्वामींचे आज्ञेस अंतर न करावें हा निश्चय आहे. सर्वांविर्सी लेंकरास भरंवसा स्वामींचा आहे. वाईट बरे तरी स्वा- मींचे आहों हे विनंति. [लेखांक ६६] श्री. श्रीमत् महाराज राजश्री परमहंसचावा स्वामींचे सेवेसी, चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कु- शल स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असों विशेष चिरंजीव राजश्री जैनार्दनपंत यांचं लग्न वैशाख बहुल पंचमीस योजिलें असे; तर स्वा- मींनी कृपा करून कार्य सिद्धीस पावविले पाहिजे. पहिले विनंतीपत्र सेवेसी पाठविलें आहे; परंतु प्रविष्ट झाले असेल नसेल नकळे. यास्तव हल्लीं विज्ञप्ति लिहिली आहे. आझी लेंकरें, स्वामींनीं कृपा सर्व प्रकारें करावी हें उचित असे. बहुत काय लिहिणें, कृपा केली पाहिजे हे वि- ज्ञापना. [ लेखांक ६७] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज वाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल वैशाख शुद्ध चतुर्दशी रविवारपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून ह्यांचे लग्न वैशाख १ जनार्दनपंत:- बाळाजी बाजीरावांचे सर्वात धाकटे बंधु शुद्ध ५ झणजे ता० ६ एप्रिल इ. स. १७४४ रोजी झाले. वधू रामाजी नाईक भिडे यांची कन्या सगुणाबाई (हे जनार्दनपंत भाद्रपद शुद्ध ७ ता० ८ सप्तंबर इ.स. १७४९ रोजी सातारा येथे मृत्यु पावले.) - २ वैशाख शुद्ध चतुर्दशी रविवारः – मोडकांच्या जंत्रींत हा वार बरोबर ज मत नाहीं. पत्राच्या संदर्भावरून ते जनार्दनपंतांचे लग्न झाल्यानंतर लिहिलें अ सार्वे अर्से दिसते. त्यावरून त्याची मिति ता० १४ एप्रिल इ. स. १७४४ रोज शनिवार ही बरोबर जमते.