पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ ता० भाद्रपद शुद्ध अष्टमी मंगळवारपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. "बाजीराव व चिमाजी आपा आह्मांसीं निष्ठा- पूर्वक वर्तत होते; तुझी आझांसीं प्रतारणा करितां; शालजोडी पाठविली कसरीनें खादली, ते माघारी पाठविली असे; उत्तम जोडी पाठविणें" ह्मणून कितेक आज्ञा केली, ऐसीयास आमची निष्ठा स्वामींचे चरणार- विंदीं दुसरी नाहीं. आझीं लेंकरें; स्वामी सर्व प्रकारें कृपा करून चाल- वितात; दौलत कारभार सर्व स्वामींच्या आशीर्वादाचा प्रताप; आझी आज्ञांकित असतां स्वामी शब्द लावून लिहितात हेंच अपूर्व आहे. ये विसींचा विस्तार कागदीं पत्रीं काय ल्याहावा ? स्वामींच्या चरणाव- लोकनास येणेंचें आहे ते समयीं सर्व सेवेसी निवेदन करूं. स्वामी कृपा करतील. रामचंद्र हरी याजकडीलही विनंति करणें ते दर्शनसमयीं करून स्वामी आज्ञा करतील त्याप्रमाणें वर्तणूक करूं. किनखापाविस आज्ञा केली त्यास येथें किनखाप उंच नाहीं. पुण्याहून आणून दर्शन- समयीं प्रविष्ट करूं. वरकड रा० पिलाजी जाधवराव व रामचंद्र हरी यांजकडील स्वामींनीं मजकूर लिहिला तो कळला. स्वामींनीं आज्ञा केली तें कळलें. आझी स्वामींच्या आज्ञेखेरीज नाहीं. सारांश स्वामी ईश्वरस्वरूप आहेत. स्वामींच्या चरणांविना दुसरें दैवत नाहीं. आमचें न्यून असेल तें स्वामींनी पूर्ण करावें [हें] उचित आहे. तदनुरूप स्वामी करतीलच. करावें. शालजोडी मुबदला पाठविली आहे. कृपा करून घेतली १ भाद्रपद शुद्ध अष्टमी मंगळवार:- ता० १६ आगष्ट इ.स. १७४३. मा. गील पेशव्यांचे पत्र गेल्यानंतर स्वामींकडून आलेले हे उत्तर आहे. पेशव्यांनी जी शालजोडी पाठविली ती कसरीनें खाली होती, ह्मणून ती स्वामींनी परत पाठविल्याचाही उल्लेख आहे. ह्या पत्रावरून स्वामी पेशव्यांवर कोपयुक्त झाल्याचें दिसतें. अद्यापि पेशव्यांची भेट झाली नाहीं. हे पत्र सातारच्या मुक्कामचें असावें.