पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ लांकडें आलियावर (सादर करूं). स्वामींचे आज्ञे खेरीज काय असे ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ६०] श्री. श्रीमत परमहंस महाराज श्री स्वामींचे सेवेसीः— चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक सा० नमस्कार विनंति येथील कुशल ता० छ० ७ जिल्काद पावेतों स्वामींचे कृपावलोकनें- करून यथास्थित असे विशेष. बहुत दिवस आशीर्वादपत्र येऊन परामृष न केला. ऐसें नसावें. चरणरजाचा परामृष सदैव करावा. तीर्थस्वरूप आपांनी कैलासवास केला हें वर्तमान स्वामींनीं ऐकिलेंच असेल. मोठा घातच जाहला. तीर्थस्वरूप राऊ यांणीं कैलासवास केल्यास आठ महिने न जाहले तो श्रीनें हा प्रसंग घडविला. एकाएकींच श्रीनें दुःखार्णवीं पाडिलें. होणार बळवत. श्रीइच्छेस उपाय काय ? वडील होते त्यांजवरी स्वामींची कृपा होती, तन्मुळे जो जीवित्व तोंपर्यंत कीर्तिच जाहली. त्या माघारी चरणरजावरी महाराजांची कृपा आहेच व त्या कृपेमुळे कल्याणच होईल. नवाब निजामउल्मुलुख याचा व नासरजंगाचा १ छ० ७ जिल्कादः - ता० १४ जानेवारी इ. स. १७४१. २ आपा– चिमाजी आपा हे छ० ८ सवाल झणजे तां० १७ दिसेंबर इ.स. १७४० रोजी वारले. ३ राऊ- बाजीराव हे छ० १२ सफर ह्मणजे ता० २८ एप्रिल इ. स. १७४० रोजी नर्मदातीरीं रावेर येथें वारले. ४ नासिरजंगः– हा निजामउल्मुलुक याचा दुसरा मुलगा. निजाम दिल्लीस असतांना ह्याने दक्षिणेत पुंडावा सुरू केला. त्याचें पारिपत्य करण्याकरितां निजाम दिल्लीहून दक्षिणेत आला. दिल्लीदरवारी निजामाचें वजन विशेष असल्यामुळे मा ळव्याची सनद मिळवून देण्याचे काम त्याचें साह्य होईल अशा आशेनें, पेश- व्यांनी ह्या वेळीं निजामास मदत केली व त्याची नर्मदातीरीं दादें परगणे एदला- व -