पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ स्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. "आमची व किलीजखान यांची भेटी करून देणें. त्या- चाही वृद्धापकाळ जाहला आहे तरी हे भिक्षा देणें. त्याजपासीं बहुतसें मागणें नाहीं. ज्या गांवीं संन्यास घेतला ते खेडें सातरों रुपयांचें आहे तेवढें मात्र मागोन घेऊं." ह्मणोन विस्तारें आज्ञा केली. ऐशास खेड्या करितां स्वामींनीं किलीजखानास जाऊन भेटावेंसें काय आहे ? आमची व नवाब निजामउल्मुलुख यांचे भेटीचा योग घडलियावर स्वामींचे आज्ञे- प्रमाणें खेड्याचा मजकूर करूं. जे गोष्ट स्वामींस अगत्य तेच आह्मांस अगत्य. आह्मी स्वामींचे आज्ञेखेरीज काय आहे ? गणेशाचें राजुरीचें तळें दुरुस्त जाहलें, देवालयासही काम लावणार असों, ह्मणून लिहिलें तें कळले. स्वामींच्या चित्तांत येईल तें सिद्धीस पावेलच पावेल. स्वामी ईश्वराचा अंश आहेत. मानवी मनुष्यास मात्र अवघड. स्वामींस सर्वही पदार्थ सहजांत आहेत. स्वामींनी कृपा करून समाधीचे अनुष्ठान सम- यींची दूल (धूळ?) पाठविली ते प्रविष्ट होऊन शिरसा वंदिली. घोडी पाठवून द्यावयाविसीं लिहिलें, त्यास पागा येथें जमा जाहल्या ह्मणजे स्वामींचे मर्जीप्रमाणें घोडी पाठवून देऊं. श्री भुलेश्वराचा मंडप तयार जाहला त्यास घांटी बांधावयास दोन सोट बारा हात लांब, हातभर ऊंच, या प्रमाणें देणें ह्मणोन (आज्ञा), तर आह्नीं लांकडे आणिलीं होतीं तीं बंगल्यास लाविलीं स्वामींनीं आज्ञा केली त्याप्रमाणे लांकडें नाहींत. १ किलीजखान – निजामउल्मुलुक. - २ स्वामींनी संन्यास घेतला होता तें गांव (राजुरी ?) मोंगलाईत होतें असें ह्यावरून सिद्ध होतें. तें निजामाकडून देवास मिळावें असा स्वामींचा यत्न होता. ३ राजुरी:—हें गांव कोणते ? स्वामींची जन्मभूमि जी राजुरी- जिला गणे- शाची राजुरी अर्से नांव आहे ती मोंगलाईत वेदर जिल्ह्यांत आहे. - ४ भुलेश्वर– पुणे जिल्ह्यांत पुरंदर तालुक्यांत माळशिरस ह्मणून जे स्वामींचें इनाम गांव आहे तेथील हे देवस्थान होय.