पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो चालत नाहीं. लष्कर फार; दोन तीन महिने एक जागा मुकाम जाहला; गवत चहूं गांवांहून आणावें लागतें; असें वर्तमान तेथील आहे. तें स्वामींस तीर्थरूप राजश्री आपा सेवेसीं लिहितच असतील. मीही वर्तमान विदित व्हावें ह्मणोन लिहिले असे. इराणी तोहमासकुली- खान यानें पातशहा व सर्व अमीर कैद केले आणि आपण दिल्लीस येऊन तक्तावर बसणार. पुढें दक्षिणेवर चाल करावी हाच त्याचा पुर्ता आशय आहे. पुढे येईल वर्तमान तें सेवेसी लिहून पाठवू. तीर्थरूप राजश्री राऊ बन्हाणपुराजवळ आहेत. येथील वर्तमान तरी तूर्त राजश्री छत्रपति स्वामींचा मुक्काम येथेंच आहे. विशेष अर्थ लिहावया योग्य असें नाहीं. सर्व आश्रा व आशीर्वाद आमचे मस्तकीं आहे तो वसईही येईल व तोहमासकुलीखानासही तंत्री पोहोंचेल. स्वामींनींही सदैव ले- खकांस आज्ञा करून तीर्थस्वरूप राजश्री आपांस लिहिले पाहिजे. स्वा- मींची कृपा आहे तो सर्व घडतच आहे. वरकड विशेष अर्थ आहे असें नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ५९ ] श्री. श्रीमंत महाराज श्री परमहंसवाबा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल ता। भाद्रपद बहुल पंचमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथा- - १ तोहमास कुलीखानः – नादिरशहा बाजीराव पेशव्यांच्या पत्रांत तोह- मास्त कुलीखान असें नांव दिले आहे. - २ भाद्रपद बहुल पंचमी:- एवढेच मोघम लिहिले असल्यामुळे बरोबर सन काढतां येणार नाहीं, परंतु ह्या पत्रांत पेशव्यांचे व निजामाचे भेटीचा संबंध दर्श- विला आहे ती भेट एदलाबाद परगण्यांत छ० २९ सवाल ह्मणजे ता० ७ जाने वारी ३० स० १७४९ रोजी झाली. त्या पूर्वीचें हे पत्र असल्यामुळे त्याची ता० ३१ आगष्ट इ. स. १७४० असावी असे दिसतें.