पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ झगा मंदलाचा १ पटका. १ तुरा मोत्यांचा. १ तरवार, १ कटार. १ हत्ती. ८९ [ लेखांक ५८ ] १ पटका, १ तुरा मोत्यांचा. - ८ येणेंप्रमाणें वस्त्रे दिलीं असेत. स्वामींच्या कृपावलोकनेंकरून जे होणें तें होत असे. स्वामींस वर्तमान श्रुत व्हावें यास्तव विनंति लिहिली असे. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना. वाळाजी बाजीराव. श्री. श्रीमंत महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराऊ कृतानेक विज्ञापना येथील कुशल तागाईत चैत्र वद्य पंचमी मंगळवार मुक्काम हौसाळ कृष्णातीर येथें स्वामींचे कृपेंकरून सुखरूप असो विशेष वसईकडील वर्तमान तरी मोर्चे लागले आहेत; दोन तीन सुरुंगांजवळही गेले आहेत; व पांच धमधमे तयार जाहले आहेत. परंतु सुरुंगास पाणी लागले वरून मोर्चा - १ चैत्र वद्य ५ : - ता० १७ एप्रिल इ० स० १७३९. २ हौसाळ: – हे दक्षिण महाराष्ट्रांत मिरजेजवळ कृष्णानदीच्या कांठीं लहा- नसें गांव आहे. - ३ वसईकडील वर्तमानः- वसईचा वेढा चालू होता त्या वेळचें हे पत्र आहे. बाळाजी बाजीराव ह्या वेळीं छत्रपति शाहू महाराज यांचे बरोबर हौसाळ येथे गेले होते.