पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोष्ट अगदीं गुप्त ठेविली होती. तो मात्र स्वतः नित्य स्वामींचें दर्शन घेऊन त्यांना कंदमुळे अर्पण करीत असे व गोमूत्र आणून प्राशनास देत असे. असा क्रम बरेच दिवस चालला. पुढे एके दिवशीं बाळ गौळ्यानें स्वामींस कांहीं अपक्क आम्रफळे आणून नजर केलीं. तीं स्वामींनी एका खळीमध्ये पिकावयास घातलीं. दोनचार दिवसांनीं पुनः गौळी येतांच त्याच्या देखत तीं काढून पाहिलीं तो त्या गवतामध्यें बसलेला एक प्रचंड सर्प स्वामींच्या हातास चावला. त्या- मुळे त्यांच्या हातांतून रक्तस्राव होऊं लागला. बाळ गौळी अगदर्दी अज्ञान अस- ल्यामुळे भयभीत होऊन पळून गेला. सर्पदंश झाल्यानंतर आतां हा गोसावी वांचर्णे कठीण असें त्यास वाटलें. ह्मणून दुसरे दिवशीं त्याची अवस्था काय झाली हे पाहण्याकरितां तो पुनः स्वामींच्या गुंफेजवळ आला. तो स्वामी नि- त्याप्रमाणे जप करीत बसलेले त्याच्या दृष्टीस पडले. ते पाहून त्यास सानंद आश्चर्य वाटले, आणि त्यास हा गोसावी कोणी अलौकिक महापुरुष आहे असें वाटून तो त्यांच्या फार भजनीं लागला. चिपळूण हे बंदर ह्या वेळीं जंजिन्याच्या हवशांचे ताव्यांत होते. त्यांच्या तर्फेनें चिपळूणचा सुभा आवजी बहाळ नामक गृहस्थाकडे होता व मीठबंद- राचा हवाला बाळाजी विश्वनाथ भट श्रीवर्धनकर ह्यांजकडे होता. ह्या उभय गृहस्थांस स्वामींचा महिमा श्रुत झाला. तेव्हां त्यांस स्वामींच्या दर्शनाची उत्कट इच्छा उत्पन्न होऊन त्यांनीं ह्या थोर सत्पुरुषाचे दर्शन घेतले. स्वामींची विद्वत्ता, निस्पृहता व तपःसामर्थ्य अवलोकन करून आणि त्यांचे रसाळ व मोहक भाषण श्रवण करून आवजी वहाळ आणि बाळाजी विश्वनाथ ह्यांची त्यांच्या ठि १ आवजी बहाळ: काव्येतिहाससंग्रहांतील बखरींत आबाजी बलाळ अर्से नांव दिले आहे. परंतु सातारा ग्याझिटियरकरितां दिलेल्या हकीकतींत आवजी बल्लाळ हॅ नांव दिले आहे. हेच अधिक विश्वसनीय वाटतें, आवजी बल्लाळ कोणी प्रभु ज्ञातीचे गृहस्थ असावेत. हवशाच्या पदरीं प्रभु लोक फार होते. २ बाळाजी विश्वनाथः - हा श्रीवर्धनचा देशमुख असून त्याजकडे गोवेले, बोरलई, मांडले आणि झसले ह्या चार तपांचे कुळकरणाचें वतन होतें अशी मा हिती मिळते. हे वतनाचे काम त्याचा भाऊ जानोजी विश्वनाथ हा पहात असे.