पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ विलीं. तैसेंच फिरंगी याचें उरण बळाविलें होतें तेंही घेतलें. आजच फत्ते जाल्याचे पत्र उरणाहून आले. सारांश त्याचे डोळे उघडले. व सर्व प्रकारें संभाजीचे हातोन जीवही ये समयीं वांचविला असे. सारांश इतकाही प्रताप स्वामींचे आशीर्वादाचा आहे. तेणेंकरून सर्व विचार होतात. दुसरा अर्थ नाहीं. कर्ज फिटेल ऐसें स्वामींचे मुखावाटें निघालें आहे, तेंही शेवटास जाईल. स्वामींच्या आशीर्वादावेगळें दुसरे जाणत नाहीं. उद्यां परवां घाट उतरोनही (१) कुलाब्या पावेतों जाणार आहे. तेथें न पावतां अगोदर संभाजीचा निकाल जाला तर उत्तमच आहे. नाहींतर तेथवर जाऊन होईल वृत्त तें लिहून पाठवू. निरंतर आशीर्वाद- पत्र पाठवीत जावें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ५७ ] श्री. श्रीमत् परमहंस बाबा स्वामींचे सेवेसी अपयें चिमणाजी बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल स्वामींच्या कृपावलोकनेकरून यथास्थित असे विशेष महाराज राजश्री स्वामींनीं आज कृपा करून चिरंजीव राजश्री नानास पेशवाईचीं वस्त्रे दिलीं. १ मंदील १ चादर. आह्मांस १ मंदील. १ चादर. १ झगा मंदलाचा. १ नानांस पेशवाईची वस्त्रें आषाढ शुद्ध १२ बुधवार शके १६६३ रोजीं (ता० १४ जून ३० स० १७४१) दिवसां दहा घटिकेंस सातारा येथे मिळाली. त्या वेळी चिमाजी आपा बरोबर होते. वस्त्रे मिळाल्यानंतर कांहीं दिवस साता-यास मुकाम करून नंतर ते धावडशीस ब्रह्मद्र स्वामींच्या दर्शनास गेले व तेथून बाई वगैरे ठिकाणी जाऊन उभयतां चुलते पुतणे छ० २ जमादिलाखर ह्मणजे ता० ३ आगष्ट ३० स० १७४१ रोजी पुण्यास आले.