पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७ . ● पाहिजे तें कुलाबियास पोंचविलें व सांप्रत तो आरमारानशीं कुला- ब्याजवळ आहे. तेथून तोफांचा मार दिला. त्यामुळे अलिबागेतून सरोन हिराकोटचे उत्तरेस आश्रयानें मोर्चे बांधून राहिले आहेत. नाना सागरगडाखालून खाडीचे कडेनें गेले. तेथें पंचवीस माणून संभाजी- कडील आलें होतें. त्यांत सरदार होता तो व पांच सात माणूस जिवें मारिलें व वरकड पळाले. सहा सातजण धरून आणिले. जर संभाजी लौकर निकाल काढून जीव बांचवून निघोन गेला तर उत्तमच जालें. गुराबा व थोरली गलबतें इंग्रजांचे भयानें सुवर्णदुर्गाकडे लावून दिलीं आहेत. लहान गलबतें व महागिन्या मिळोन साठ दागिने, तरतीं साख- रीचे खाडीजवळ ठेविली आहेत. जर धीर धरून मोर्चेबंदी करून रा हिला तर मोर्चे लावून पारपत्याचा विचार करणें तैसा स्वामींच्या आ- शीर्वादाचे बळें करीतच आहों. इंग्रजांस मार्ग देऊन जाऊं द्या ह्मणोन संभाजीनें सांगून पाठविलें होतें; परंतु इंग्रेजानें मान्य केलें नाहीं. आझी औरंगाबाद प्रान्ती आहों, ये प्रान्तीं धान्य नाहीं, ऐसा समय पाहून [ संभाजी ] आले होते. तुमचा आशीर्वाद आमचे मस्तकीं अ- सतां त्यांस समय काय फावणार आहे ? कळावें ह्मणून लिहिले असे. मानाजीची स्थापना आझीं फेली; परंतु त्यास स्मरण न राही ऐसें जहालें. कितेक प्रकारें वावगी वर्तणूक आह्मांशीं केली. त्याचा विस्तार लिहि- ल्यानें चित्तांत येणार नाहीं. जे समयी पाय पाहूं तेव्हां विदित करूं. उरण जागा फिरंग्याची ते आपणच बळकावली. तैसेंच आमच्या उरावर बांधिला (१) तेविशीं व पैक्याविशीं वारंवार लिहिलें, परंतु ते गोष्ट चि- त्तांत न थे. आज पांचा वर्षांत एक पैसा आमचा देणें तो दिला नाहीं. बहुतच अमर्यादा मांडिली. यास्तव त्याचे डोळे उघडावे. याकरितां तजविजेनें पाल व मिरगड दोन्ही जागे संभाजीच्या हातांस जात होते; तेथील लोकांचा दिलासा करून ते जागे घेऊन आपली निशाणें चढ-