पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ बागत उतरोन हिराकोट घेतला, सागरगड घेतला, चौलेचा कोट घे- तला, थैळचा कोट घेतला, अलीबागेत कुलाब्याचें पाणी बंद केलें. ये समय येऊन आपले रक्षण करावें." ऐसें मानाजीचें पत्र नानांजवळ आलें. येतांच नानांनीं चार पांचरों राऊत, वासुदेव जोशी व विठ्ठल शिवदेव व अंताजी नारायण यां समागमें देऊन रवाना केलें. आझांस मानाजीचं पत्र होतें तें आह्मांकडे पाठविलें. पत्र मार्गी पावलें तेच दिवशीं लांब मजल करून घोडनदीवर मुक्काम केला. तेथूनच माना- जीस आश्वासनाचें पत्र लिहून रवाना केले. दुसरे दिवशीं विसां को- सांची मजल करून लोहगांवास आलों. मानाजीचे कुमकेविषयीं इं ग्रजांसही पत्रे पाठविलीं. तेच दिवशीं पुण्याहून चिरंजीव नानांस रात्रीं बोलावून आणून त्यां समागमें सारी फौज देऊन रवानगी केली. ते येथून पांचवे रोज कुलाबियास जाऊन पोहोंचले. आपणही पुण्यास जाऊन तीन दिवस तेथें राहून, मातुश्रीचें दर्शन व आज्ञा घेऊन, वार होऊन काल येथें आलों. नाना तेथें पावले. तेच दिवशीं संभाजी कडील चौकी बाहेर उभी हिराकोटाजवळ आश्रयास होती ते मारिली. पंचवीस तीस माणूस कापून काढिलें. तुळाजी आंगऱ्या जखमी घरून आणिला आहे. इंग्रजही अगोदर कुलाबियास येऊन पाणी सामान जें - १ हिराकोटः– हा अलिबाग शहराच्या ईशान्येस समुद्रकिनाऱ्याजवळ एक प्रचंड किल्ला आहे. हा कान्होजी आंग्र्यानें इ. स. १७२० मध्ये बांधला असें ह्म- णतात. हा इ. स. १८४० पर्यंत आंग्यांच्या ताब्यांत होता. २ सागरगड:-हा किला अलिबागेच्या पूर्वेस ६ मैलांवर आहे. ह्या किल्ल्याच्या एका टोंकावरून अपराधी लोक समुद्रांत सोडीत असत. त्या टोंकास 'वानर टोंक' असें नांव आहे. ३ चौल:- रेवदंडा. हे बंदर इतिहासप्रसिद्ध आहे. येथे पोर्तुगीज लोकांचा अंमल पुष्कळ वर्षे होता. ४ थळ:- हा अलिबागेच्या उत्तरेस तीन मैलांवर आहे.