पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ चेतों बोलाविलें, यास्तव येथें आलों. काल शहरांत त्याचे हवेलीस गेलों होतों. चार सहा घटिका बसलों होतों. बेदराहून निरोप घेऊन एकूणीस हजार स्वार, बीस हजार बरकंदाज, दीडशें तोफा, तीन हजार जेजाला, तीनशें उंट बाणांचे इतकें सामान मोंगलाचें होतें. स्वामींच्या आशीर्वादें आमचीच सलावत ( झाली). आशीर्वादपत्र पाठवीत जावें हे विज्ञापना. [ लेखांक ५६ ] श्री. श्रीमत् परमहंस बावा स्वामींचे सेवेसी. चरणरज चिमणाजी वलाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल तागाईत छ० २३ मोहरम चैत्र वद्य दशमी मुकाम किल्ले कोरिंगड घांटमाथा यथास्थित असों विशेष. औरंगाबादेहून पारनेरा- नजीक आलों तेथें “राजश्री संभाजी आंग्रे सरखेल एकाएकी अली- १ छ० २१ मोहरम: - ता० १० एप्रिल इ. स. १७४०. , २ संभाजी आंग्रे सरखेल:- कान्होजी आंग्यास एकंदर सहा पुत्र होते. त्यां- पैकीं औरस सखोजी व संभाजी; व दासीपुत्र तुळाजी, मानाजी, धोंडजी आणि येसाजी. कान्होजी वारल्यानंतर सखोजी कुलाब्याचा मालक झाला, व संभाजीस सुवर्णदुर्ग दिलें. सखोजी इ. स. १७३३ मध्ये मृत्यु पावला. त्याचे मागून सं- भाजी गादीचा मालक झाला, परंतु तो सुवर्णदुर्गातच राहत असे. संभाजीचें व मानाजीचें पटेनासें झाल्यामुळे इ. स. १७३४ मध्ये बाजीराव पेशव्यांनी कुला- ब्यास जाऊन त्यांचा तंटा मिटविला. मानाजीस कुलाबा देऊन वजारतमात्र असा किताब दिला, व संभाजीस सरखेल हें पद दिलें. परंतु ह्या बंधूंचे अधिक अधिक वैमनस्य वाढून संभाजीनें मानाजीस त्रास देण्याचा क्रम आरंभिला. आणि बाजीराव व चिमाजी हे औरंगाबादेस आहेत अशी संधि साधून कुलाब्या वर स्वारी केली. तेव्हां मानाजीनें पेशव्यांस व स्वामींस पत्र लिहिली. त्यावरून पेशवे त्याच्या मदतीस गेले. •